Tarun Bharat

मळगावात महामार्गावरच अतिक्रमण

काही भाग तोडून बांधकाम, महामार्ग प्रशासन सुस्त

वार्ताहर / सावंतवाडी:

मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव भागात खुलेआम अतिक्रमण करण्यात आले आहे. घाटमार्ग काही भागात खचून धोकादायक बनला आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमण केले जात आहे. मळगाव महामार्गालगत रस्त्याचा काही भाग तोडून अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामाला कुणाचा वरदहस्त आहे? बांधकाम कुणाच्या परवानगीने केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव ब्राहृमणआळी, सुतारवाडी, रेडकरवाडीकडे व सावंतवाडीकडे येणाऱया मार्गालगत अनधिकृतपणे हायवे तोडूनच बेकायदा बांधकाम करून गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरून ये-जा करताना अडचणीचे ठरत आहे. भविष्यात स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का? तसेच महामार्ग प्रशासनाची परवानगी आहे का? जर परवानगी असेल तर हायवेला लागून बांधकाम करता येते का, असा सवाल उपस्थित होत आहे. तसे असेल तर सर्वसामान्य जमीनधारकांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याचा काही भाग तोडला गेला असताना संबंधित विभाग गप्प का, असा सवाल व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे संपर्क साधला असता या प्रकरणी चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

दत्तजयंतीला रशियन दांपत्याची उपस्थिती ठरली लक्षवेधी

Anuja Kudatarkar

रत्नागिरीच्या बाजारात आला आफ्रिकन ‘मलावी हापूस’

Archana Banage

समूहगीत गायन स्पर्धेत दोडामार्ग येथील सावंतवाडा प्रा. शाळेचे यश

Anuja Kudatarkar

वाशिष्ठी पुलाचे काम दिवस-रात्र सुरू !

Archana Banage

खेडमध्ये पावणे दोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त

Patil_p

मालवणच्या सुकन्येचा गोवा शासनातर्फे सन्मान

NIKHIL_N