Tarun Bharat

मसाज सेंटर, स्मोक शॉपचे परवाने रद्द

गैरधंदे खपवून घेणार नाही -पोलिसांचा इशारा

प्रतिनिधी/ बेळगाव

गैरधंद्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टिळकवाडी येथील एक मसाज सेंटर व कोल्हापूर सर्कलजवळील द स्मोक शॉपचे परवाने रद्द केले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी शनिवारे ही माहिती दिली आहे. गैरधंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही पोलीस अधिकाऱयांनी दिला आहे.

काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील न्यू गेटवे युनिसेक्स स्पा या मसाज सेंटरवर 6 फेब्रुवारी रोजी सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी छापा टाकला होता. यावेळी दोघा जणांना अटक करून तीन तरुणींची सुटका करण्यात आली होती. मसाज सेंटरच्या नावे गैरकृत्य चालविण्यात येत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.

या पार्श्वभूमीवर न्यू गेटवे युनिसेक्स स्पाचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मसाज सेंटर चालकाचे धाबे दणाणले होते. मसाज सेंटरच्या नावे अनैतिक कृत्ये चालविण्यात येत होती. त्यासाठी परप्रांतीय तरुणींचा वापर करण्यात येत होता. आता या मसाज सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

कोल्हापूर सर्कलजवळील इंद्रछाया कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या द स्मोक शॉप या दुकानावर छापा टाकून 8 किलो 685 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. सीईएन विभागाने 15 ऑक्टोबर 2020 रोजी ही कारवाई करून तिघा जणांना अटक केली होती. द स्मोक शॉपमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात आला आहे. 

Related Stories

वरेरकर नाटय़संघातील चित्र प्रदर्शनाची सांगता

Amit Kulkarni

रेल्वे स्थानकासमोरील बसथांब्याच्या शेडचे काम सुरू

Amit Kulkarni

बेळगावात महिलेला कोरोनाची लागण

Patil_p

लाळय़ाखुरकत लसीकरण मोहीम 7 नोव्हेंबरपासून

Amit Kulkarni

लक्ष्मी टेकडी येथील सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

गोवा-बेळगाव महामार्ग कामाबद्दल सुप्रीम कोर्टातून पुन्हा 29 ऑक्टोबर तारीख

Patil_p