Tarun Bharat

मस्त नूडल्स कटलेट

Advertisements

पावसाळ्यातल्या एखाद्या रम्य संध्याकाळी छानशी     गरमागरम पण चविष्ट डिश बनवायची असेल तर नूडल्स कटलेटचा पर्याय निवडता येईल. चहापानाला येणार्या पाहुण्यांनाही ही डिश नक्कीच आवडेल.

साहित्य : आटा नूडल्सचं एक पाकीट, किसलेला कोबी एक कप, अर्धा कप चीझ, एक कांदा बारीक चिरून घ्या, एक हिरवी मिरची, तीन चमचे कॉर्नफ्लोर, तेल आणि मीठ

कृती : पाकिटावरच्या सूचनांनुसार नूडल्स उकडून घ्या. उकडताना त्यात मसालाही घाला. नूडल्स थंड होऊ द्या. आता किसलेल्या कोबीमध्ये कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मीठ घाला. हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा. हे मिश्रण आणि कॉर्न फ्लोर नूडल्समध्ये घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. आता नूडल्सच्या मिश्रणाचे चपटय़ा आकाराचे कटलेट्स करा. फ्राईंग पॅन किंवा कढईत तेल घाला. आता ही कटलेट्स डीप किंवा शॅलो फ्राय करता येतील.  ही गरमागरम कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खा. 

Related Stories

हिरव्या मुगाचा पौष्टिक आणि रुचकर डोसा

Kalyani Amanagi

पंजाबी टिक्की

Omkar B

घरच्या घरी बनवा लहान मुलांना आवडणारे पोटॅटो स्माईली

Kalyani Amanagi

छातीत जळजळ, अपचनसारख्या त्रासाने त्रस्त आहात? मग रिकाम्या पोटी मनुका खा

Archana Banage

ओट्स कुकीज

Omkar B

थंडीत बनवा गरमा-गरम बाजरीची खिचडी,जाणून घ्या रेसीपी

Archana Banage
error: Content is protected !!