Tarun Bharat

मस्त मिल्क केक

सणावारानिमित्ताने घरीच एखादी   मिठाई करून बघण्याचा विचार मनात येतो. सध्याचा कोरोना काळ आणि मिठायांमध्ये होणारी भेसळ पाहता घरची मिठाईच बरी वाटते. तुम्हालाही     सणासुदीला किंवा खास प्रसंगी मिठाई करायची असेल तर साधा, सोपा, झटपट होणारा मिल्क केक हा खूप चांगला पर्याय आहे. घरी केलेल्या मिल्क केकमुळे सणासुदीचा गोडवा अधिकच वाढेल.

साहित्य ः दोन लीटर फुल क्रीम दूध, दोन चमचेलिंबाचा रस, दीडशे ग्रम साखर, एक मोठा चमचा तूप, वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप कृती ः सर्वात आधी आपल्याला दूध आटवायचं आहे. यासाठी भांडय़ात किंवा कढईत दूध काढून गॅसवर ठेवा. दुधावर साय येऊ नये, यासाठी सतत हलवत रहा. छान रवाळ मिल्क केक बनवण्यासाठी दूध अर्धं होईपर्यंत आटवून  घ्या. यानंतर दुधात लिंबाचा रस घालायचा आहे. आधी चमचाभर लिंबाचा रस घालून थोडा वेळ ढवळत रहा. त्यानंतर 5 ते10 मिनिटांनी आणखी एक चमचा लिंबाचा रस  घालून दूध ढवळत रहा. काही वेळानंतर दूध रवाळ होऊ लागेल. याच टप्प्यावर दुधात साखर घालायची आहे. दुधातली साखर वितळेपर्यंत ढवळत रहा. आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी-जास्त करू शकता. दूध घट्ट झाल्यावर त्यात एक छोटा चमचा तूप घालून मंद आचेवर शिजवून घ्या. वेलची पूडही घाला. यावेळीही दूध ढवळत रहा. मंद आचेवर शिजवल्यामुळे दुधाचा रंग बदलून ब्राउन होऊ लागेल. मिल्क केकही मस्तपैकी रवाळ होईल.  दुधातलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर गॅस बंद करा. आता एक मोल्ड किंवा परात घ्या. त्याच्या मध्यभागी तसंच चारही बाजूंना तूप लावून घ्या. कढईतलं मिश्रण हळूवारपणे परात किंवा मोल्डमध्ये घाला. हे मिश्रण थंड करण्यासाठी सहा तास ठेवा. त्यावर बदाम-पिस्त्याचे काप पसरा. साधारण सहा तासांनी मिल्क केकच्या कडेने सुरी फिरवून घ्या. संपूर्ण मिल्क केक एका ताटात काढून घ्या. चौकोनी किंवा आयताकृती तुकडे करा. हा केक फ्रीजमध्ये आठवडाभर टिकतो.

Related Stories

टोमॅटो ग्रेव्ही

tarunbharat

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी खमंग काजू बर्फी

Kalyani Amanagi

स्टफ्ड कटलेट

Omkar B

अननस श्रीखंड पुरी

tarunbharat

‘रमजान’साठी आरोग्यदायी खजूराचे विविध प्रकार दाखल

Abhijeet Khandekar

पनीर मेथी भुर्जी

Omkar B
error: Content is protected !!