Tarun Bharat

महांतेशनगरात धोकादायक उघडे चेंबर

Advertisements

महापालिकेने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी : त्वरित दुरुस्तीची गरज

प्रतिनिधी /बेळगाव

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात एकीकडे स्वच्छता मोहीम आणि रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे महांतेशनगर परिसरात उघडे असलेले ड्रेनेज चेंबरवरील झाकण घालण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 अधिवेशनासाठी राज्यातील आमदार, मंत्री महोदय बेळगावात येत असल्याने स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मुख्य रस्त्याची अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. काही ठिकाणी दुभाजकांची रंगरंगोटी करून डोळय़ात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू आहे. मंत्रीमहोदयांच्या स्वागतासाठी विविध कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. पण दुसरीकडे नागरिकांना भेडसावणाऱया समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. महांतेशनगर परिसरात पशू वैद्यकिय रुग्णालयाच्या जवळील रस्त्यावरील डेनेज चेंबर गेल्या कित्येक दिवसापासून खुले आहे. रस्त्याच्या कॉर्नरवर असलेले उघडे चेंबर रात्रीच्यावेळी लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रीमहोदयाच्या स्वागतासाठी मनपाच्या अधिकाऱयांना वेळ आहे. पण नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. महांतेशनगर परिसरातील समस्यांसह उघडय़ा चेंबरवर झाकण घालण्याची मागणी होत आहे.

Related Stories

खानापूर शिवप्रतिष्ठानतर्फे भीमगड किल्ल्यावर गडकोट मोहीम

Amit Kulkarni

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पतीचा मृत्यू

Amit Kulkarni

‘किंगपिन’ किरण विरनगौडरला अखेर अटक

Rohan_P

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

Amit Kulkarni

गोगटे चौकातील उद्यानाचा विकास बारगळला

Amit Kulkarni

भूमिगत कचराकुंडी बसविण्यासाठीची निविदा अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!