Tarun Bharat

महांतेशनगर येथे दारु दुकानाला विरोध

Advertisements

अबकारी अधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

महांतेशनगर येथे लोकवस्तीत दारु दुकान सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या संबंधी जिल्हाधिकारी व अबकारी अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे.

ब्रम्हकुमारी ईश्वरी विद्यापीठाच्या जवळच दारु दुकान सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी रोज धार्मिक कार्यक्रम होतात. त्यामुळे दारु दुकानाला परवानगी देवू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांचा विरोध डावलून परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधी 14 फेब्रुवारी 2021 रोजी अबकारी विभागाला निवेदन देण्यात आले होते. तरीही दारु दुकानाला परवानगी दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी या परिसरात दारु दुकानाला परवानगी देवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. नजीर सुरकोड, रामा वास्कर, प्रज्वल बुकाली, भारती गाडीवड्डर यांच्यासह अनेकांच्या या निवेदनाव्दारे सह्या आहेत.

Related Stories

निवडणुकीत ‘मनी ऍण्ड मसल पॉवर’ला अधिक महत्त्व

Patil_p

विद्यादान हे अन्नदान, नेत्रदान, देहदान, धनदानादिकांहून सर्वश्रेष्ठ दान आहे

Patil_p

सिडनीत कोरोनाने वाढवली चिंता 17 जुलैपर्यंत निर्बंध

Patil_p

कोरोनामुळे राज्यात 24 तासांत 7 बळी

Omkar B

विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट लवकर दूर कर – मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

मतदान केंद्रांवर सर्व व्यवस्था ठेवा

Patil_p
error: Content is protected !!