Tarun Bharat

महागाईची झळ आणखी तीव्र; पेट्रोल-डिझेल सोबतच रुग्णालय उपचार खर्च ही महागणार ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली


देशात महागाईने सामान्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहेच. दिवसागणिक वाढत जाणारे इंधनाचा परिणाम होऊन सामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर ही गगनाला भिडले आहेत. यातच आता खासगी रुग्णालये उपचाराचा खर्च वाढवण्याच्या मनस्थितीत असल्याची बाब समोर आली आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या वृतानुसार, पुढील वर्षापासून वैद्यकीय उपचार अधिक महाग होऊ शकतात कारण वाढत्या खर्चात प्रमुख खाजगी रुग्णालये उपचार पॅकेजचे दर पाच ते दहा टक्के वाढवण्याच्या विचारात आहेत. ही रुग्णालये रोखीने पैसे भरणाऱ्या रुग्णांसाठी किंमत वाढवण्याच्या विचारात आहेत. काही खाजगी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की २०२१-२२ च्या अखेरीस पॅकेज दरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

एका रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही एक मोठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शृंखला आहोत. आमच्या इथे लाइट, भाडे इ. वर नियमित खर्च केला जातो. करोनामुळे मनुष्यबळाचा वाढता खर्च आणि इतर ऑपरेटिंग खर्चाचा परिणाम होऊनही आम्ही २०१९ पासून त्याच दराने रुग्णांवर उपचार करत आहोत. आम्ही परिस्थितीचे मूल्यमापन करत आहोत आणि योग्य वेळी पॅकेज सुधारणांबाबत निर्णय घेऊ.” असे ही ते यावेळी म्हणाले रूग्ण रोख रक्कम भरणे, विमा कंपन्यांनी दिलेली बिले आणि संस्थात्मक रूग्ण किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांसारख्या सरकारी योजना या तीन प्रवाहांतून रुग्णालये कमाई करतात. अधिका-यांनी सांगितले की ते रोख पैसे देणाऱ्या रुग्णांसाठी किंमत वाढवण्याची शक्यता आहे.

Related Stories

हेलिकॉप्टर अपघात तांत्रिक बिघाडामुळे

Patil_p

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता ‘RTPCR’ सक्ती नाही

Archana Banage

जिल्हा न्यायालयांची भूमिकाही महत्त्वपूर्ण!

Patil_p

प्रयागराजमध्ये प्रियंका वड्रांचे धार्मिक स्नान

Amit Kulkarni

मुलायमसिंह यादव यांचे निधन

Patil_p

कसबा मतदारसंघात आचारसंहितेचा भंग

datta jadhav