Tarun Bharat

महागाईचे चटके देणाऱया भाजपाला घरी पाठवा–लुईझीन फालेरो

वाळपईत 200 कार्यकर्त्याचा तृणमूल पक्षात प्रवेश

प्रतिनिधी /वाळपई

 भाजपाची सत्ता गोवा व केंद्रामध्ये आहे  अच्छे दिन देण्याचे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आले होते. मात्र ती आश्वासने पूर्णपणे पोकळ ठरलेली आहेत. आज सर्वसामान्य जनता महागाईच्या जात्यात  भरडली जात आहे. पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती सातत्याने वाढू लागले आहेत. अशा अवस्थेत भाजपा मात्र ही दरवाढ रोखण्यासाठी अपयशी ठरलेला आहे. दुसऱया बाजूने काँग्रेस पक्षाची अवस्था पूर्णपणे बिकट झालेली आहे.

 यामुळे गोव्याच्या जनतेचे काँग्रेस पक्षावर अजिबात विश्वास नाही. ामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेला तृणमूल काँग्रेस पक्षाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष आपला ठसा निश्चित प्रमाणात दाखवून देईल असा दावा या पक्षाचे नेते लुईझीन फालेरो यांनी वाळपई लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना केले .

यावेळी काँग्रेस पक्षाच्या 200 कार्यकर्ते तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी लुईझीन फालेरो यांनी त्यांना पक्षाचा फलक देऊन पक्षामध्ये प्रवेश दिला .तूणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेस कार्यकर्ते यात प्रामुख्याने गट समितीचे मावळते अध्यक्ष दशरथ मांदेकर सुरेश कोदाळकर मोहम्मद खान युनुस खान विठोबा गावकर एस पी मराठे नकुल गावकर विजय मांदेकर यांचा खास करून समावेश आहे .

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की एकेकाळी गोवा हे जागतिक स्तरावर श्रीमंत राज्य होते. आज पक्षाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कमजोर झालेली आहे. प्रत्येकाच्या डोक्मयावर लाखो रुपयांचे कर्ज दडलेले आहे. यामुळे येणाऱया काळात प्रत्येक गोमंतकीयांना याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील .भाजपाला पश्चिम बंगालमध्ये सातत्याने तीन विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर देणाऱया  ममता बॅनर्जी याच एकमेव भाजपाला खऱयार्थाने धडा शिकू शकतात हे आता सिद्ध झालेले आहे. यामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यामध्ये चांगल्या प्रकारचा पर्याय म्हणून उभा राहणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. काँग्रेस पक्षावर सडकून टीका करताना त्यांनी सांगितले की दोनवेळा गोव्यातील जनतेने काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत दिले होते. मात्र काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचा खरा मारेकरी ठरला असून या पक्षांमध्ये दडलेले दलाल काँग्रेस पक्षाला रसातळाला नेत आहेत याची जाणीव  आता गोवेकरांना झालेली आहे .यामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता तृणमूल काँग्रेसच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा दावा यावेळी त्यांनी केला. वाळपई मतदार संघामध्ये मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांनी या पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येणाऱया विधानसभा निवडणुकीस स्थानिक मुद्याचा जाहीरनामा प्रसारित करून तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येतील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 पक्षाच्या महिला कार्यकर्ता प्रतिभा बोरकर ढगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय सीमोल्लंघन करण्यासाठी आता गोवेकरी जनतेने सिद्ध व्हायला हवे असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आनंद नाईक यांनी यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी व उत्कर्षासाठी या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात कार्य केले. मात्र गिरीश चोडणकर यांचा मनमानी कारभार यामुळे आज मोठय़ा प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी ते म्हणाले. सुरुवातीला दशरथ मांजरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Stories

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांविरूध्द मुरगाव पालिकेची दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

पर्वरी शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रोहन खंवटे

Patil_p

दोषी टॅक्सीचालकांना सोडणार नाही

Patil_p

शिक्षण व रोजगाराचा समांतर पूल शिरोडय़ाला नेणार स्वयंपूर्णतेकडे…!

Amit Kulkarni

आगोंद ग्रामसभेत विविध समस्यांवर चर्चा

Amit Kulkarni

तानावडेंना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ

Amit Kulkarni