Tarun Bharat

”महागाई वगैरे काही नाहीये, पेट्रोल डिझेलचा दर वाढवणं हा काँग्रेसचाच प्रोपगंडा”

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमी कोणत्या कोणत्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असतात. सध्या देशात महागाईचा भडका उसळला आहे. पेट्रोल डिझेलचे वाढत्या भावावरून भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. इंधन दरवाढ काँग्रेसच्या प्रोपगंडाचा भाग ठरवली असल्याचे विधान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. भोपाळ महापालिकेच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, हे लोक जे प्रोपगंडा पसरवत आहेत की पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय. महागाई वगैरे काही नाहीये, ही काँग्रेसची मानसिकताच आहे. फुकटचा प्रोपगंडा आहे. त्याचबरोबर प्रदुषणमुक्त गाड्या उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे आभारही मानले आहेत. त्या म्हणाल्या, पूर्वी रिक्षातून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत होता. कारण, धूळ आणि प्रदुषणचं इतकं होतं.

तर काँग्रेसनेही ठाकूर यांच्या या विधानावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, पूर आला..काँग्रेसमुळे? महागाई आली..नेहरुंच्या भाषणामुळे? महागाईची अडचण आहे तर अफगाणिस्तानात जा? आणि आता प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतायत की महागाई वगैरे काही नाही, ही काँग्रेसची मानसिकताच आहे, त्यांचा प्रोपगंडा आहे? यांचं मानसिक संतुलन तपासायला हवं.

Related Stories

सरकारचे लसीकरण धोरण भेदभावजनक – सोनिया गांधी

Archana Banage

नैराश्यावर मात; गरजवंतांना हात

Patil_p

चिनी सैन्याची उत्तराखंडमध्ये घुसखोरी; पूल उध्वस्त

datta jadhav

Video-चिमुकल्याने खा.अमोल कोल्हेंना जोडले दोन्ही हात

Abhijeet Khandekar

देशात 37,566 नवे बाधित

datta jadhav

माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!