Tarun Bharat

महाड दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/ महाड

महाडमधील ताहीर गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल चाळीस तासाची अथक शोध व बचाव कार्य थांबवण्यात आले असून ढिगाऱयाखालील अडकलेल्या 9 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पहिली अटक झाली असून बुधवारी आरसीसी सल्लागार बाहुबली धामणेला मुंबईत पोलीसांनी ताब्यात घेतले.

  काजळपुरा परिसरांतील 10 वर्षापुर्वी बांधलेली ताहीर गार्डन ही इमारत 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कोसळली. स्थानिक नागरिक, प्रशासकीय यंत्रणा, एनडीआरएफ जवान व विविध स्वयंसेवी संस्थांकडून तत्काळ मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. तब्बल 19 तासाच्या प्रयत्नानंतर  चार वर्षाच्या मोहमद बांगी या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर  महिरुनिस्सा अब्दुल हमीद काझी या महिलेला 28 तासानंतर ढिगाऱयांखालून बाहेर काढण्यांत आले. तब्बल 40 तासानंतर हे शोधकार्य थांबवण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण 16 जणांचा बळी गेला आहे.

                                         दुर्घटनेतील मृतांची नावे

  सयद हमिद शेखनाग (45),आदिल हमीद शेखनाग (14), रोशनबी दाऊदखान देशमुख (56),नौसिन नदिम बांगी (30),मतिन मुकादम (45), फातिमा शौकत अलसुलकर (60),नवीद झमाने (30), इस्मत हसिम शेखनाग (38), फातिमा अन्सारी (43), शौकत आदम अलसुलकर (50), अल्तमश बल्लारी (35), आयशा नोसिन बांगी (7), रुकया नोसिन बांगी (2),अब्दुल हमिद काझी (58),हबिबा दाऊद हाजवारे (80) कामरुनिसा अन्सारी (63) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर नमिरा शौकत अलसुलकर (19),संतोष सहानी (24), फरिदा रियाज पोरे, जयप्रकाश कुमार (24), दिपक कुमार (21), स्वप्निल प्रमोद शिर्के (23), नवीद हमिद दुष्टे (32), मोहम्मद नोसिन बांगी (4), मेहरुनिस्सा अब्दुल हमिद काझी (60) यांचा समावेश.

धोकादायक इमारती विरोधांत कारवाई

महाड शहरांतील काजळपुरा परिसरांतील ताहिर गार्डन ही पाच  मजली इमारत सोमवारी संध्याकाळी कोळसली आणि शहरांतील धोकादायक इमारतीचा प्रश्न चर्चेमध्ये आला,अनेक धोकादायक जुन्या इमारतीमधुन रहिवासी राहत आहेंत. शहरांतील पानसरे मोहल्ला परिसरांतील अल कासिम कॉम्प्लेक्स इमारत पुर्णपणे धोकादाक असल्याने या इमारती मधील सर्व रहिवाश्यांना जागा सोडण्याच्या नोटीसा बजावण्यांत आल्या आहेंत,ही कारवाई तातडीने करण्याचे आदेश महाड पालिकेच्या बाधंकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुहास कांबळे यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदेंनी घेतली दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

महाड इमारत दुर्घटनेतून वाचलेल्या 4 वर्षीय मोहम्मद नौसीन बांगी आणि 5 वर्षीय अहमद हशीम शेकनाग या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. निवासी शाळेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. मोहम्मद आणि अहमद यांना मंगळवारी ढिगाऱयाखालून काढण्यात आले. मोहम्मदचे आई आणि दोन बहिणींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर अहमदचे आई वडीलांचा देखील मृत्यू झाला आहे.

पहिल्या आरोपीला अटक

ताहीर गार्डन इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलीसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामधील पहिल्या संशयिताला बुधवारी अटक करण्यात आली. आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने धामणेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी केसरकरांना धडा शिकवणार -प्रवीण भोसले

Anuja Kudatarkar

Ratnagiri : 8 लाखाच्या कर्जासाठी 9 लाख 26 हजार दिले तरीही फसगत

Abhijeet Khandekar

रत्नागिरी जिह्यात कोरोनाचे 8 नवे रूग्ण, चाचण्यांमध्येही घट

Archana Banage

अखेर पांजरवाडा पुलाचे काम पूर्णत्वाकडे

Anuja Kudatarkar

कोलगावातील बेपत्ता व्यक्तीचा आडेलीत गळफास स्थितीत आढळला मृतदेह 

Anuja Kudatarkar

सद्गुरू संगीत विद्यालयातर्फे ३१ जुलैला ‘गुरुवंदना’

Anuja Kudatarkar