Tarun Bharat

महात्मा गांधींच्या पणतीला तुरुंगवास

दक्षिण आफ्रिकेत फसवणुकीप्रकरणी दोषी- 7 वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग

महात्मा गांधी यांची पणती आशीष लता रामगोबिन (56 वर्षे) यांना दक्षिण आफ्रिकेत 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. डरबन येथील एका न्यायालयाने 60 लाख रँडच्या (3.22 कोटी) फसवणुकीप्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावली आहे. आशीष लता याप्रकरणी 2015 पासून जामिनावर बाहेर होत्या.

लता रामगोबिन गांधींच्या पणती आणि प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि मेवा रामगोबिन यांच्या कन्या आहेत. मेवा यांचे निधन झाले आहे. इला गांधी यांना भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील बडे उद्योजक एस.आर. महाराज यांनी आशीष लता यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. महाराज यांची न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी आहे. चप्पल-बूट, कपडे आणि लिनेनची आयात, विक्री आणि निर्मितीचे काम ही कंपनी करते. त्यांची कंपनी प्रॉफिट मार्जिन अंतर्गत अन्य कंपन्यांनाही आर्थिक मदत करते.

लता यांनी महाराज यांची 2015 मध्ये भेट घेतली होती. भारतातून लिनेनचे 3 कंटेनर मागविले असून साउथ आफ्रिकन हॉस्पिलट ग्रुप नेट केयरला पुरवायचे असल्याचे सांगितले होते. दक्षिण आफ्रिकेपर्यंत कंटेनर आणण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत लता यांनी महाराज यांना नेट केयर कंपनीशी संबंधित दस्तऐवजही दाखविले होते. यानंतर महाराज यांनी त्यांच्यासोबत व्यवहार करत पैसे दिले होते. दोघांदरम्यान नफ्यातील हिस्सेदारीबद्दल चर्चा झाली होती. फसवणुकीचा थांगपत्ता लागल्यावर कंपनीच्या संचालकाने लता यांच्याविरोधात तक्रार केली होती. 2015 मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती.

Related Stories

भारतात मुस्लिम महिलांकडे दुर्लक्ष – मलाला

Abhijeet Khandekar

अमेरिकेत मोनोक्लॉनल अँटीबॉडी थेरपीला मान्यता

datta jadhav

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर पुरवणार : डोनाल्ड ट्रम्प

Tousif Mujawar

पाकिस्तानवर ओढवली आता युएईची नाराजी

Omkar B

पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी आळवला शांततेचा सूर

Patil_p

ड्रगनने भूतानला वादात ओढले

Patil_p
error: Content is protected !!