Tarun Bharat

महात्मा गांधींबद्दलआक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला मध्य प्रदेशात अटक केली. कालीचरणवर ही अटकेची कारवाई छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरणला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्म संसदेत बोलताना कालीचरण यांने महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर धर्म संसद वादात सापडली होती. यावरुन संसदेत गदारोळ निर्माण झाला होता. यारुन कालीचरण याला अटक व्हावी यासाठी ही जोरदार मागणी होत होती. या कारवाईसाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे अटकेसाठी पोलीसांचे दोन गट करत अटकेची कारवाईची चक्रे गतीमान झाली होती.

कालीचरणवर महाराष्ट्रातही गुन्हे दाखल

महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजविरोधात ठाणे शहरात पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींसंबंधी वापरण्यात आलेल्या शब्दामुळे मला दुःख झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. नौपाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, धार्मिक भावना भडकावण्याच्या उद्देशाने तसेच इतर गुन्ह्यांसाठी आयपीसी कलम २९४, २९५ए, २९८, ५०५(२) आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कालीचरण महाराज मूळचा अकलो्याचा असून तिथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाची परवानगी

datta jadhav

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनेकडून गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

अमित शहा यांच्यावर ‘एम्स’ मध्ये उपचार

Patil_p

‘हे’ आहे ओमायक्रॉन संसर्गाचे नवे लक्षण

datta jadhav

हिमस्खलनानंतर 5 नौसैनिक बेपत्ता

Patil_p

कोल्हापुरात 12 जागा रिपाइं लढवणार : आठवले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!