Tarun Bharat

महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सिझेरियन शस्त्रक्रियेचा लाभ

Advertisements

प्रतिनिधी / करमाळा

उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया चालू असून आज पर्यंत 141 गरोदर महिलांच्या मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे करण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आवश्यक असणाऱ्या खाजगी तज्ञ डॉक्टरांच्या मानधनात शासन प्रक्रियेतून विलंब होत असल्यामुळे तालुक्यातील गरीब व गरजू रूग्णांची गैरसोय होऊ नये.

यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी मुंबईत आज मंत्रालयामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना करमाळा  आमदार संजयमामा शिंदे यांनी मागणी पत्र दिले असून त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. 

Related Stories

सोलापूर शहरात 86 ,ग्रामीण भागात 1539 नव्या कोरोना रुग्ण

Archana Banage

वादळी वारे आणि पावसाने बार्शी तालुक्‍यातील उस झोपला

Archana Banage

सोलापूर विमानतळाजवळ भीषण आग

Archana Banage

सोलापूर : करमाळा तालुक्यात 123 कोरोना रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर : कोविडसाठी नगरविकास विभागाकडून पत्र आल्याने उपायुक्तपदी पांडेंची नियुक्ती

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये 267 कोरोनामुक्त

Archana Banage
error: Content is protected !!