Tarun Bharat

महात्मा फुले रस्त्याशेजारील पेव्हर्सचे काम अर्धवट

प्रतिनिधी / बेळगाव

महात्मा फुले रोडचा विकास करण्यासाठी कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला, पण या रस्त्यावरील अडथळे कमी झाले नाहीत. डेनेज वाहिनी घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली होती. पेव्हर्स घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण हे काम अर्धवट राहिल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

शहराची गणना स्मार्ट सिटी म्हणून करण्यात येत आहे. काही रस्त्यांचा विकास करून स्मार्ट बनविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. दुसरीकडे सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची खोदाई करून भकास करण्यात आले आहे. विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई केली जाते. तातडीने रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. महात्मा फुले रोडचे रुंदीकरण करून दुतर्फा पेव्हर्स घालण्यात आले होते. मात्र, हे काम करण्यास बराच विलंब लागला. सदर रस्त्याचा विकास पूर्ण झाल्यानंतरही विविध कामे सुरूच आहेत. कधी डेनेज वाहिनीसाठी खोदाई, तर कधी विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येते. काही वेळा जलवाहिनी घालण्यासाठी रस्ता खोदला जातो. त्यामुळे या रस्त्यावरील अडथळे कायम आहेत. रस्त्याचा विकास केल्यानंतर काही महिनेच हा रस्ता व्यवस्थित होता. मात्र, त्यानंतर अडथळय़ांची शर्यत सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी डेनेज वाहिनी घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली होती. पण खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता सुस्थितीत करणे कंत्राटदाराची जबाबदारी असते. पण काही ठरावीक कारणास्तव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट ठेवले आहे. काही ठिकाणी डेनेज वाहिन्या घातल्यानंतर पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पादचाऱयांना या रस्त्यावरून ये-जा करताना अडचण होत आहे. मातीचे ढिगारे, पेव्हर्सचे ढिगारे ठेवण्यात आल्याने वाहनधारकांनाही अडथळा होत आहे. त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित कधी होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. येथील अर्धवट कामे पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

रताळी व्यापाऱयांकडून मनमानी दर

Patil_p

कोरोनाबाधित मृतांचा आकडा नेमका किती?

Amit Kulkarni

उशिरापर्यंत चालणाऱया हॉटेल-बिअरबारवर होणार कारवाई

Amit Kulkarni

तालुक्मयात पुनर्वसू नक्षत्राची दमदार एन्ट्री

Patil_p

भुतरामहट्टीजवळ अपघातात नरसिंगपूरचा तरुण ठार

Omkar B

आरटीओ सर्कल सोन्यामारुती मंदिरात महापूजा-महाप्रसाद

Patil_p