Tarun Bharat

महाद्वार रोड येथील युवक बेपत्ता

Advertisements

मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

महाद्वार रोड येथील एक युवक गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या पत्नीने मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फकिराप्पा शिवाजी काळे (वय 38, मुळचा रा. अळणावर, सध्या रा. महाद्वार रोड) असे त्याचे नाव आहे. फकिराप्पा हा भाजी मार्केटमध्ये हमाली करतो. त्याची पत्नी रविवारपेठ येथील एका हॉटेलमध्ये काम करते. मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी एका फंडातून 7 हजार रुपये काढुन पत्नीने फकिराप्पाच्या हातात दिले. त्याने ती रक्कम भरली नाही म्हणून या दांपत्यामध्ये भांडण झाले होते. मुलांची फी का भरला नाही, अशी विचारणा केल्यानंतर भांडण झाले.

23 फेब्रुवारी रोजी रात्री भांडणानंतर घरातील सर्व मंडळी झोपी गेले. दुसऱया दिवशी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता भाजी मार्केटला कामावर जाण्याचे सांगून फकिराप्पा आपल्या घराबाहेर पडला. तो अद्याप घरी परतला नाही.

मार्केट पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फकिराप्पा कोणाला आढळल्यास मार्केट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

सौंदलग्याच्या कांद्याचा बेंगळूर बाजारात ‘भाव’

Patil_p

बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये; लॉकडाऊन शिथिल

Patil_p

दूधसागरनजीक रेल्वेवर कोसळली दरड

Omkar B

रामतीर्थनगर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

Amit Kulkarni

गोवा बनावटीची दारू कणकुंबीजवळ जप्त

Amit Kulkarni

विविध मागण्यांकरिता बँक कर्मचाऱयांचा संप

Patil_p
error: Content is protected !!