Tarun Bharat

महानगरपालिकेमार्फत माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानाची तयारी पूर्ण – उपायुक्त

प्रतिनिधी / सांगली

प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातुन बाहेर काढून कृष्णा नदीने मोकळा श्वास घ्यावा, गतवैभव प्राप्त करून सांगलीकरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी माझी वसुंधरा अंतर्गत महानगरपालिकेमार्फत सोमवारी 21 रोजी सांगली येथील कृष्णा नदीच्या काठावरील सरकारी घाट, माई घाट(समर्थ घाट) या ठिकाणी “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत “कृष्णामाई स्वच्छता अभियान” आयोजित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम होत आहे.

या तयारीचा आढावा उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी घेतला. २१ रोजी सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.माझी कृष्णामाई स्वछता अभियानात सहभागी व्हा असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी केले.

सोमवारी होत असणाऱ्या माझी कृष्णामाई स्वछता अभियानात सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था यांनी सदर माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानांतर्गत कृष्णा नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडील स्वच्छतेकामी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह या अभियानात सहभागी होऊन आपली कृष्णामाई स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.

Related Stories

खानापुरात सुहास शिंदेंची सत्ता कायम

Archana Banage

साळमाळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून

Archana Banage

कोरोना मुक्तीसाठी साईभक्तांची शिर्डीला पायी वारी

Archana Banage

सांगली : मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपुरला पदोन्नतीवर बदली

Archana Banage

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या भगिनी डॉ. मधु पाटील यांचे निधन

Kalyani Amanagi

ऊस तोडणीसाठी यंदा पैसे मागितल्यास तक्रार करा : साखर आयुक्त

Archana Banage