Tarun Bharat

महानगरात सायकल मागणी 50 टक्क्मयांनी वाढली

Advertisements

नवी दिल्ली

 कोरोना संकट आणि लॉकडाऊननंतर क्यवसाय रुळावर आणण्यासाठी व्यापाऱयांना संघर्ष करावा लागतोय. हे सुरु असतानाच दुसरीकडे मात्र सायकल उद्योग तेजीत येत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये मे आणि जूनमध्ये सायकलची मागणी 50 टक्क्मयांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

बंदच्या काळातून काहीसे सावरताना अन्य उद्योग बंद अवस्थेत असताना दुसऱया बाजूला सायकलची मागणी खूप मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दुकानांमध्ये शिल्लक असणारा साठा समाप्त होत आहे. ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (एसीएमए) अनुसार मागणी तेजीत असताना दुसऱया बाजूला काही प्रमाणात उत्पादन होत असल्याच्या कारणामुळे मागणी पूर्ण करण्यात मागे पडल्याची नोंद केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अन्य वाहतुकीची साधने बंद होती तर कोविडच्या  भीतीमुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीला पर्याय निर्माण करत सायकलला पसंती दिल्यानेच सायकलची मागणी तेजीत राहिली असल्याची माहिती हिरो मोर्ट्स कंपनीचे चेअरमन पंकज एम. मुंजाल यांनी यावेळी दिली आहे.

उत्पादन जूनमधील

मे महिन्यात संघटीत क्षेत्रातील व्यवसायाने 35 टक्क्मयांनी वर्कफोर्ससोबत काम केल्याने जवळपास 4.5 लाख सायकल निर्मिती केली आहे. जूनमध्ये या उद्योगाने 65 टक्के क्षमतेचा वापर करुन 8.5 लाख सायकलींचे उत्पादन केले असल्याचे एसीएमएचे महासचिव केबी ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.

सदरची सायकल मागणी ही ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात मोठय़ा प्रमाणात राहिली आहे. यामध्ये तब्बल 50 टक्के सायकल मागणी ही महानगरांमध्ये राहिली आहे. याचा अर्थ शहरी ग्राहकांनी सायकलीस मोठी पसंती दिली आहे, असा थेटपणे होतो.

Related Stories

लवकरच जीएसटी परिषदेची 40 वी बैठक होणार

Patil_p

विशेष श्रमिक रेल्वे फेऱयांतून कमाई 360 कोटींची

Patil_p

स्पाइस जेटला 600 कोटींचा फटका

Patil_p

डिमार्टच्या महसूलात 46 टक्के वाढ

Patil_p

रियलमीचे डिजो वॉच भारतात सादर

Patil_p

तेजीच्या सुरूवातीनंतर शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!