Tarun Bharat

महान हॉकीपटू चरणजीत सिंग यांचे निधन

नवी दिल्लीः पद्मश्री व अर्जुन पुरस्कारजेते महान हॉकीपटू चरणजीत सिंग यांचे हिमाचल प्रदेशमधील उना जिल्हय़ात वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 92 वर्षांचे होते. दोनवेळचे ऑलिम्पियन चरणजीत सिंग भारताच्या वैभवशाली हॉकी युगाचे साक्षीदार ठरले. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला नमवत 1964 टोकियो ऑलिम्पिक्समध्ये हॉकीचे सुवर्ण जिंकले. याशिवाय, 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया भारतीय संघातही त्यांचा समावेश होता.

20 नोव्हेंबर 1929 रोजी जन्मलेल्या चरणजीत सिंग यांनी कर्नल ब्राऊन केम्ब्रिज स्कूल, डेहराडून व पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले. आंतरराष्ट्रीय हॉकीमधील देदीप्यमान योगदानानंतर सिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे फिजिकल एज्युकेशन विभागाचे संचालकपदी ते कार्यरत होते. जून 2021 मध्ये हॉकी इंडियाने टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर, विद्यमान संघाला प्रेरणा देण्यासाठी फ्लॅशबॅक सिरीजचे आयोजन केले, त्यावेळी त्यांनी 1964 ऑलिम्पिक फायनलच्या आठवणींना उजाळा दिला होता.

भारतीय खेळाडू सुवर्णपदकासह मायदेशी दाखल झाले, त्यावेळी कसे जंगी स्वागत झाले, त्याचेही त्यांनी त्यावेळी मुक्तकंठाने वर्णन केले होते. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ग्यानेंद्रो निंगोम्बम यांनी हॉकी वर्तुळासाठी हा अतिशय वाईट दिवस आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवली.

Related Stories

गुजरात टायटन्सचे आयपीएलमध्ये विजयी पदार्पण!

Patil_p

रूटची नको असलेल्या विक्रमाशी बरोबरी

Patil_p

भारत-द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

लि निंग कराराबाबत फेरविचार

Patil_p

भारतीय स्कीट नेमबाजांना पदकांची हुलकावणी

Patil_p

पाक सुपर लीग स्पर्धेचे यजमानपद अबुधाबीकडे

Patil_p