Tarun Bharat

महापालिका क्षेत्रात अवघे पाच रूग्ण वाढले

Advertisements

ग्रामीण भागात 98 रूग्ण वाढलेः उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यूः एकूण रूग्णसंख्येने 45 हजाराचा आकडा गाठलाः 168 रूग्ण कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात कोरोना आता आटोक्यात येवू लागला आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 103 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात फक्त पाच रूग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात 98 रूग्ण वाढले आहेत. 168 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णसंख्या 45 हजार 85 झाली आहे. तर 41 हजार 754 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका क्षेत्रात अवघे पाच रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णसंख्या आता आटोक्यात येवू लागली आहे. शनिवारी महापालिका क्षेत्रात अवघे पाच रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात तीन तर मिरज शहरात दोन रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच अवघे पाच रूग्ण वाढले आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 16 हजार 19 रूग्ण झाले आहेत. यातील 93 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.

ग्रामीण भागात 98 रूग्ण वाढले

ग्रामीण भागातही रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रथमच 100 पेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे हा जिल्ह्याला दिलासा मिळत चालला आहे. ग्रामीण भागात शनिवारी 98 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात सात, जत तालुक्यात सात, कडेगाव तालुक्यात 17 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात चार, खानापूर तालुक्यात 14, मिरज तालुक्यात आठ, पलूस तालुक्यात तीन, शिराळा तालुक्यात 12 नवीन रूग्ण वाढले. तासगाव तालुक्यात 16 तर वाळवा तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत.

उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात उपचार सुरू असताना चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जत तालुक्यातील दोघांचा मृत्यू झालाआहे. तर कडेगाव तालुक्यातील एकाचा व कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 639 रूग्णांचा बळी गेला आहे.

41 हजार 754 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात शनिवारी 168 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात 41 हजार 754 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे रूग्ण बरे होण्याचा दर आता 92 टक्के इतका झाला आहे. कोरोना जिल्ह्यात आता आटोक्यात येवू लागला आहे.

दोन हजार 528 स्वॅब तपासले

जिल्ह्यात शनिवरी दोन हजार 528 स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये 856 आरटीपीसीतून स्वॅब तपासले आहेत. तर एक हजार 672 रॅपीड ऍण्टीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन 103 रूग्ण वाढले आहेत.

परजिल्ह्यातील दोन रूग्ण वाढले

परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात येतात. शनिवारी परजिल्ह्यातील दोन रूग्ण वाढले आहेत. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील एक रूग्णांचा समावेश आहे. आजअखेर एक हजार 396 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये एक हजार 150 रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात 40 रूग्ण आहेत. आजअखेर 206 रूग्णांचा बळी गेला आहे.

नवीन रूग्ण 103
उपचारात 1692
बरे झालेले 41756
एकूण 45085
मयत 1639

Related Stories

इस्लामपुरात शिवसैनिक पक्षाबरोबरच! एकसंघ राहण्याचा सांगलीत निर्धार

Abhijeet Khandekar

प्रचार सोडून उमेदवार धावला अपघातग्रस्ताच्या मदतीला

Abhijeet Shinde

संस्थान गणपतीची पारंपरिकरित्या उत्साहात स्थापना

Abhijeet Shinde

मिरजेत घर कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत 377 नवीन रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

सांगली एसटी विभागातील ८८ बसेस इतर डेपोत रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!