Tarun Bharat

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ !

Advertisements

संजीव खाडे / कोल्हापूर

महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ करत आहे, याचे एक उदाहरण सांगणार धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.  शहरातील कचरा उठावसाठी स्वच्छ भारत योजनेतून महापालिकेला मंजूर झालेल्या टिपरवर (कचरा उठाव करणारी गाडी) चालकांबरोबर हेल्पर (मदतनीस) नियुक्त शासकीय आदेशात नमूद आहे. मात्र महापालिकेने हेल्परची भरती न करता घंटागाडीवर काम करणाऱया कामगारांना हेल्परचे काम करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते सफाई आणि गटर्सची स्वच्छता यावर परिणाम झाला असून त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसे दिवस गंभीर होताना दिसत आहे.

स्वच्छ भारत योजनेतून कोल्हापूर महापालिकेला पहिल्या टप्प्यात 104 टिपर मंजूर झाले. ते दाखलही झाले. त्यातून शहरातील कचरा उठाव करण्याचे कामही सुरू झाले. दररोज सकाळी टिपरव्दारे शहरातील गल्लीत संगीत वाजवित स्वच्छतेची जाणीव करत प्रत्येक नागरिकाच्या घरातून ओला आणि सुका कचरा संकलित केला जातो. या टिपर दाखल होऊन बरेच महिने लोटले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने हेल्पर नियुक्त केलेले नाहीत. वास्तविक स्वच्छ भारत योजनेतील तरतूद आणि नियमावलीनुसार प्रत्येक टिपरवर एक चालक अर्थात ड्रायव्हर आणि एक मदतनीस अर्थात हेल्पर नियुक्त करणे बंधनकारक आहे. पण आरोग्य विभागाने टिपरच्या माध्यमातून काम सुरू झाल्यानंतरही हेल्परची नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

घंटागाडीवरील 104 कामगार टिपरवर

टिपर येण्यापूर्वी शहरातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून संकलित केला जात होता. पण गेल्यावर्षीपासून टिपरव्दारे कचरा संकलन सुरू झाले. प्रत्यक्षात टिपरवर ड्रायव्हरबरोबर एक हेल्परही असणे आवश्यक आहे. पण हेल्परची भरती करण्याऐवजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडीवर काम करणाऱया 104 कामगारांना हेल्परचे काम दिले आहे. हे सर्व कामगार शहरातील रस्ते सफाई आणि गटर्स स्वच्छतेचे काम करणाऱया विभागातील आहेत. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱयांच्या संख्येत वाढत्या कामाच्या तुलनेत घट झाली आहे. त्याचा परिणाम स्वच्छतेच्या कामावर झाला आहे.

रस्ते स्वच्छता, गटर्स सफाईवर परिणाम

शहरासह उपनगरात वाढत्या नागरिककरणाबरोबर कॉलनीही वाढत आहेत. त्यामुळे रस्ते आणि गटर्स सफाईचे कामही वाढले आहे. त्या तुलनेत कामगारांची संख्या कमी आहे. आरोग्य विभागाकडे 1565 झाडू कामगार आहेत. डेनेज विभागात डेनेज काढण्याबरोबर सार्वजनिक शौचालय, सरकारी संडास सफाईसाठी 250 कामागार आहेत. रस्ते, गटर्स स्वच्छतेची जबाबदारी झाडू कामगारांकडे आहे. त्यातील काही जणांना हेल्परचे काम दिल्याने रस्ते, गटर्स सफाईवर परिणाम झाला आहे. शहरातील अनेक भागातील रस्ते लोटण्यावर कामगार कमी असल्याने मर्यादा आल्या आहेत. त्याबरोबर गटर्स काढण्याच्या कामावरही विपरीत परिणाम झाला आहे. कामगारांची संख्या, टिपरला दिलेले कामगार, कामगारांच्या रजा, सुट्टÎा, आजारपण यांचे गणित घालत आरोग्य विभागातील मुकादमांना उपलब्ध कामगारांच्या संख्येवर कामांचे वाटप करण्याची वेळ आहे. त्याचा फटका प्रत्येक कामावर झाला आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक भागातील, गल्लीतील गटर्स तुंबल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रस्ते सफाई होत नसल्याच्याही तक्रारी होत आहेत. त्यावर आरोग्य विभाग मार्ग काढणार की नागरिकांच्या आरोग्याशी खेळत राहणार हा सध्या महापालिकेवरील प्रशासकराजच्या काळातील प्रश्न आहे. दरम्यान, मंजूर हेल्परच्या नियुक्त का रखडल्या आहेत? याविषयी मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पोवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

दुसऱया टप्प्यात 69 टिपर येणार

स्वच्छ भारत योजनेतून कोल्हापूर महापालिकेला पहिल्या टप्प्यात 104 टिपर मिळाले. दुसऱया टप्प्यात 69 टिपर येणार आहेत. त्याचे टेंडरही लवकरच निघणार आहे. त्Îामुळे महापालिकेला नजीकच्या काळात ड्रायव्हर, हेल्परचे नियोजन करावे लागणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : पेठ वडगावात ५ कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या १६६ वर

Abhijeet Shinde

महाराष्ट्र शासनाची कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती

Abhijeet Shinde

जिल्ह्यात रुग्णांचा आकडा थांबता थांबेना ; सायंकाळपर्यंत ५२ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

ग्रामीण भागातील मोबाईल सेवा विस्कळीत

Abhijeet Shinde

आज कोल्हापूर बंद, सकाळी महामार्ग रोखणार

Abhijeet Shinde

‘गोकुळ’ दुध उत्पादकांच्या मालकीचा करणार : मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!