Tarun Bharat

महापुराच्या नावाखाली शिवसेनेची मुंबईत नवी वसुली मोहीम, निलेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई/प्रतिनिधी

राणे पिता – पुत्र यांच्या आगळ्या वेगळ्या वक्तव्याची नेहमीच चर्चा होत असते. बऱ्याच वेळा त्यांच्या विधानामुळे वादंग देखील निर्माण झाला आहे. आता माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय. मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय.

निलेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना पाहून बाळासाहेबांची शिवसेना आठवते का? असा सवाल त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना बघून सुशांतसिंग हत्या प्रकरण आठवतं. बाटली आणि ग्लास आठवतो, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला. जिथं बाळासाहेब नाहीत तिथल्या पक्षात कसली श्रद्धा, असा सवालही त्यांनी केलाय.

निलेश राणे यांनी आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती. शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही. शिवसेना भवनात आता सर्व अमराठी लोक दिसतील. तिथे आलेले सर्व बिलिंगसाठी आलेले असतात. मातोश्रीवर बॅग घेऊन आलेल्या माणसालाच प्रवेश मिळत असल्याचा घणाघातही निलेश रामे यांनी यावेळी केलाय.

Related Stories

कोकणातील जांभा दगड चिरेखाणींना, आठ दिवसात परवानगी

Archana Banage

शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी आंधप्रदेश येथून एकास अटक

Archana Banage

स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे ‘हे’ विशेष ‘१२७’ अतिथी लावणार उपस्थिती

Archana Banage

त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

अपघातग्रस्त दाम्पत्याची पालकमंत्र्यांनी केली चौकशी

Patil_p

भूमिपूजनासाठी 159 नद्या अन् 3 समुद्राचे पाणी घेऊन दोन भाऊ अयोध्येत दाखल

datta jadhav