Tarun Bharat

महापूर नियंत्रण नागरी कृती समितीची बैठक पार

सांगली प्रतिनिधी

सांगली पाटबंधारे मंडळ, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक व कार्यकारी अभियंता देवकर मॅडम यांचे सोबत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती यांची बैठक पार पडली, बैठकीमध्ये कृष्णा नदीस येणाऱ्या महापुरावर शासनाच्या माध्यमातून या विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत त्यांच्या बरोबर चर्चा केली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले. संबंधित प्रस्ताव सचिव व जलसंधारण मंत्री यांच्या बैठकीमध्ये निर्णय होईल व तो प्रस्ताव नागरिकांसाठी खुला होईल असे सांगण्यात आले.

नदीपात्रात येणारे अडथळे, कोप बंधारे, नदीवरील बांधकामे, पूलाच्या बाजूचा भराव, नागरी वसत्या मुजलेले नाले, पर्जन्यमापक यंत्र, या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. संदर्भि चर्चेतून असे निष्पन्न झाले नवीन पूलाला होणारा भराव याची जबाबदारी बांधकाम विभागाची असून त्या विभागाने महापुरास कारणीभूत ठरणाऱ्या या अडथळा बाबत पाटबंधारे विभागाकडून कोणतेही परमिशन घेतली नाही. याबाबत राष्ट्रीय महामार्ग यांनी या परिसरातील नागरिक तसेच होणारे नदीपात्रातील अडथळे, बाजूस टाकलेला भराव याची चाचपणी होणे आवश्यक होते. परंतु तसे काही घडले नाही.

धामणी जवळील रस्ता पूलाला भराव न घालता वास्तविक पुराचे पाणी खालून जावे याची काळजी संबंधित विभागाने घ्यायला पाहिजे होती. त्यामुळे त्यामुळे धामणीच्या भरावामुळे सांगली मधील शामरावनगर, विश्रामबाग या भागात पाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच अलमट्टी धरण व हिप्पर्गी बंधारा याचा पाण्याचा फुगवठा हा महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत येत नाही.असे सांगितले जाते. परंतु राजापूर बंधाऱ्यावर मार्च मध्ये सुद्धा पाणी होते फुगवटाचे पाणी नसेल तर मग हे पाणी कशाचे आहे. हे पाटबंधारे खाते, वडनेरे समिती यांनी याचा अभ्यास करावा त्यामुळे पुराचे पाणी वाहून न जाता नदी परिसरातील भाग पाण्याखाली जातो व शेतकऱ्यांचे तसेच जन-जनजीवन विस्कळीत होते. अलमट्टी धरणातील पाणी पातळी महापुराच्या वेळी 516 ठेवून त्या पेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता संबंधित पाटबंधारे घ्यायला पाहिजे, पाटबंधार खात्याने त्याचा योग्य तो पाठपुरावा करावा,यावर महसूल खात्याने लक्ष ठेवावे तसेच कृषी विभाग, महसूल विभाग व पाठबंधारे यांनी पर्जन्यमापक यंत्र ज्या ज्या ठिकाणी बसवले आहे त्याचा सेंट्रल डेटा कलेक्शन व्हायला पाहिजे अशा सूचना बैठकीतून देण्यात आल्या व पाठबंधारे विभाग हा समीतीला सहकार्य करु असे आश्वासन दिले. बैठकीला सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, माजी नगरसेवक हणमंतराव पवार सर्जेराव पाटील, संजय कोरे, धनाजी चडमुंगे, दिपक पाटील, सूनील गरडे, प्रशांत शहा आदी उपस्थित होते.

Related Stories

सांगली, मिरजेत ‘मेकॅनिकल पार्किंग’चा नवा पर्याय

Archana Banage

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट ; दिला ‘हा’ सल्ला

Archana Banage

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन ; सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी

Archana Banage

पुलवामा चकमकीत सोलापूरचे सुनील काळे शहीद

datta jadhav

हाफिज सईदला 15 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

‘जी-7′ संघटनेत दक्षिण कोरियाला सहभागी करण्यास जपानचा विरोध

datta jadhav