Tarun Bharat

महापौर चषकाचा ‘चाँद ताऱया’चा लोगो बदलला..!

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे बुधवार दि.4 रोजी सुरू होणाऱया महापौर चषक स्पर्धेचा लोगो बनविण्यात आला आहे. तो लोगो जाती-जातीमध्ये तेढ करण्याचा प्रयत्न करणारा व अक्षेपार्ह असल्यामुळे शहर  शिवसेनेतर्फे महापालिकेसमोर मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका प्रशासनातर्फे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचा अक्षेपार्ह व चुकीचा लोगो रद्द करून दुसरा लोगो प्रसिध्द करण्यात आला.

     शहर शिवसेनेच्यावतीने मंगळवारी महापौर फुटबॉल स्पर्धसाठी बनवण्यात आलेल्या आक्षेपार्ह लोगो विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. भगवे ध्वज    घेवुन आंदोलकांनी महापालीकेच्या प्रवेशव्दारावर जोरदार घोषणाबाजी करित याचा निषेध केला. यावेळी बोलताना शहरप्रमुख इंगवले म्हणाले, महापौर चषक दरवर्षी आयोजीत करण्यात येतो. रामाच्या नावाखाली रहिम खुर्चीवर बसून चुकीचा संदेश देत असेल तर तो करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींचा अवमान आहे. चाँद तारा डोक्यावर घेऊन वावरणार असतील तर राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीला ते भूषणावह नसेल. अशा महापौरांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. अंकुश निपाणीकर म्हणाले, समानतेची शिकवण देणाऱया या करवीर नगरीमध्ये जाती-पातीच्या राजकारणाला शिवसेना कदापिही सहन करणार नाही. हे राजकारण मोडून काढले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

किशोर घाडगे म्हणाले, अक्षेपार्ह व चुकीचा लोगो प्रसिध्द झाल्यानंतर शहरातील विविध तालीम संस्थांनी नाराजी व्यक्त केली. जाणून-भूजून लोंगो बनविणाऱयांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अजित गायकवाड म्हणाले, छत्रपती ताराराणींपेक्षा या राज्यात कोणीही मोठे नाही. हे आयुक्तांना पटवून दिल्यामुळे त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने लोगो बदलण्याचे आदेश प्रशासनाला दिले.  यावेळी शिवसेनेचे कपिल केसरकर, जयवंत हारुगले, राहूल इंगवले, राकेश माने, सुकुमार लाड, विनय चंदुगडे, सचिन कारंडे, विजय परिते, सुनिल जोशी, आबा जगदाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कायद्याचा सन्मान राखला गेला : सुप्रिया सुळे

tarunbharat

कोरोना लढ्यात महाराष्ट्र सरकार अपयशी!

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 47 रूग्ण

prashant_c

वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

prashant_c

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी, पूल टेस्टिंगला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c

मराठमोळे आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील ठरले गलाई बांधवांसाठी देवदूत

Archana Banage
error: Content is protected !!