Tarun Bharat

महाबळेश्वरला पावसाने हजारी ओलांडली

कोयनेचा पाणीसाठा 40.93 टीएमसीवर

प्रतिनिधी/ नवारस्ता

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे मात्र अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. परिणामी धरणाच्या  पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवक कमी होऊन ती प्रतिसेकंद 11 हजार 575 क्युसेक इतकी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा 40.93 टीएमसी झाला आहे.

दरम्यान गेल्या आठ दिवसांत संततधार पावसामुळे महाबळेश्वर येथे पावसाने हजारी ओलांडली आहे. सोमवारी सायंकाळी पर्जन्यमापक केंद्रावर 1013 मिलीमीटर इतक्या एकूण पावसाची नोंद झाली.

       गेल्या आठवडय़ापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला बुधवारी रात्री तर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढू लागला मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात पाण्याची आवक कमी होऊन ती प्रतिसेकंद 11 हजार 575 इतकी झाली. शुक्रवारी सकाळीही आवक प्रतिसेकंद 49 हजार 604 इतकी होती.

दरम्यान सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 16 (810), नवजा 18 (913) आणि महाबळेश्वर येथे 14 (1013) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 40.93 टीएमसी झाला आहे. दरम्यान पाटण तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाचा जोर मंदावला.

कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सरासरी गाठेल

कोयना पाणलोट क्षेत्रात गत आठवडय़ापासून सुरु झालेला मान्सूनच्या दमदार पावसाने जोरदार एंट्री केली आणि अवघ्या आठवडाभरातच पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर पर्जन्यमापकांवर पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा सोमवारी पार केला. तर कोयना आणि नवजा पर्जन्यमापकावर पाऊस हजारी टप्प्याच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. या पाणलोट क्षेत्रात सरासरी प्रतिवर्षी 5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षीही  पाणलोट क्षेत्रात पाऊस सरासरी इतकाच कोसळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

शिवसेनेकडून संभाजीराजेंवर अन्याय

datta jadhav

सातारकर प्रेक्षकांना आणखीन पहावी लागणार वाट

Patil_p

जिल्हा पूर्णपणे निर्बंधमुक्त केव्हा होणार?

datta jadhav

साताऱयात सोशल डिस्टन्सचा फज्जा

Patil_p

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका

Archana Banage

धान्य गोदाम दुरूस्ती कामकाज युध्दपातळीवर सुरू

Patil_p