Tarun Bharat

महाबळेश्वरात संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

आरोग्य विभाग हडबडले; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
महाबळेश्वर/प्रतिनिधी


महाबळेश्वरच्या एमटीडीसी विलीगीकरण कक्षामध्ये शनिवारी सायंकाळी एकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी रविवारी सकाळी उघडकीस आला.

पंधरा दिवसांपूर्वी संबंधित युवक महाबळेश्वर तालुक्याच्या झांजवड गावात आला होता.हा युवक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत असून त्याला दारुचे व्यसनही होते. सतत आत्महत्या करण्याची धमकी तो करत होता असेही स्थानिक व विलीगीकरण कक्षातील सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ही व्यक्ती करोना बाधित आहे का नाही हे अहवाल आल्यानंतर समजणार आहे.घटनास्थळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील,पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी,आरोग्य अधिकारी अजय कदम व झांजवडचे ग्रामस्थ उपस्थित आहेत.त्याचे शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.घटनास्थळी आरोग्य विभाग आणि पोलीस बंदोबस्त दाखल आहे.सदर व्यक्तीचे नाव प्रशासनाकडून अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

Related Stories

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांना दिली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची संधी

Patil_p

प्रवीण दरेकर, केदारनाथ धाम देवालयाचे लोकार्पण

Patil_p

25 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप खोटा

datta jadhav

रहिमतपूर-सातारा अवैध दारु कनेक्शन उद्ध्वस्त

Patil_p

कोळकेवाडी धरण परिसरात आज संचारबंदी

Patil_p