प्रतिनिधी / महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली गावातील गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर आज दुपारी वीज कोसळली या अपघातात ते दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले.
याबाबात अधिक माहिती अशी की टेकवली येथील सुभाष लक्ष्मण जाधव वय ७५ व शंकर संभाजी गायकवाड वय ७३ हे दोन शेतकरी नेहमीप्रमाणे टेकवली गवानजीकच्या वारल शिवारात गुरे चारण्यासाठी घेले होते आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला पावसापासून वाचण्यासाठी हे दोन्ही शेतकरी जवळच असलेल्या उंबराच्या झाडाखाली उभे राहिले होते.
दरम्यान मुसळधार पाऊस सुरु असतानाच विज या उंबराच्या झाडावर आदळली या विजेच्या उष्णतेने हे दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले व तेथेच जाग्यावर कोसळले बराच वेळ त्यांना हलताही येत नव्हते सुदैवाने त्या शिवरापासून निघालेल्या काही लोकांनी त्यांना पाहिले व त्यांनी या दोघांना घरी आणले नातेवाईकांनी त्यांची अवस्था पाहून त्यांना उपचारासाठी बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ पी के देशमुख यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले आता या अपघाताने शेतकऱ्यांना मानसिक धक्का बसला असून सुदैवाने या दोघांचेही प्राण वाचले असल्याची माहिती डॉ पी के देशमुख यांनी पत्रकारांना दिली.