Tarun Bharat

महाबळेश्वर परिसरातील कोरड्या विहिरीत पडला गवा

Advertisements

महाबळेश्वर/प्रतिनिधी

महाबळेश्वरपासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्याच्या अंदाजे वीस फूट खोल कोरड्या विहिरीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक रानगवा पडला. हा रानगवा गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती वनविभागास देण्यात आली. शुक्रवारी सकाळी वनविभागाची टीम दाखल होत घटनेची माहिती घेतली.

गव्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमसह पालिका जेएसबी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र वनविभागाने पुणे येथील तज्ज्ञांच्या रेस्क्यू टीमला संपर्क साधला आहे. गुरुवारी पाण्याच्या शोधात हा गवा विहिरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Related Stories

सातारा :आंबेदरे येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला

Abhijeet Shinde

विनापरवाना मांस वाहतूक करणारे दोघे ताब्यात

Omkar B

जिल्ह्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

datta jadhav

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

Patil_p

देशाच्या विकासात सहकाराचे योगदान मोलाचे : अमित शाह

datta jadhav

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

Patil_p
error: Content is protected !!