Tarun Bharat

महाबळेश्वर : राष्ट्रीय लोक अदालतीत २०९ प्रकरणे निकाली

महाबळेश्वर / प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवसात महाबळेश्वर न्यायालयातील दिवाणी व फौजदारी विभागाकडील प्रलंबित १०० प्रकरणे व १०९ वादपूर्व अशी एकूण २०९ प्रकरणे निकाली काढून १ कोटी ८७ लाख ४४ हजार ०७९ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. लोक अदालतीचे पॅनेल प्रमुख न्यायाधीश शैलेश कंठे, सदस्य ॲड जे. एस. बोधे, ॲड संजय जंगम यांनी काम पाहिले.

यावेळी पंचायती समितीचे सहा गटविकास अधिकारी सांगळे, विस्तार अधिकारी सुनिल पार्टे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार दस्तुरे, ॲड. एस.व्ही. जायकर, ॲड. राजेश जायकर, ॲड आर.एच. भोसले तसेच इतर विधीज्ञ, सदस्य व पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सातारा : शाळेत कोरोना प्रादुर्भाव झाल्यास मुख्याध्यापकांस जबाबदार धरू नये

Archana Banage

उरमोडी नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

Archana Banage

पोलिसाला धमकी प्रकरणी आरोपीला 1 वर्ष कारावास

Patil_p

सातारा : सदर बाजारमधील रहिवाशी कर्नाटकात मतदानासाठी रवाना

datta jadhav

अजिंक्यतारा पुन्हा होरपळला….

Patil_p

बावधनच्या तिघांवर तडीपारीची कारवाई

Patil_p