Tarun Bharat

‘महामारी’च्या घोषणेला सहा महिने पूर्ण

Advertisements

जगभरात 2 कोटी 83 लाख बाधित : 9 लाख मृत्यू : ‘डब्ल्यूएचओ’ची राजकीय नेतृत्त्वावर नाराजी

कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झपाटय़ाने होऊ लागल्यानंतर डब्ल्यूएचओने या रोगाला ‘महामारी’ असे संबोधले होते. या संबोधनाला आता 6 महिने पूर्ण झाले असून अद्यापही कोरोनाचा संसर्ग थांबताना दिसत नाही. विविध देशांमध्ये प्रभावी नेतृत्व नसणे ही सर्वात मोठी चिंता आहे, असे भाष्य करत जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत जगभरात  2.83 कोटी प्रकरणे पुढे आली असून 9 लाख 15 हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत. मात्र, 2 कोटींहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला आहे.

अमेरिकेत 65 लाख 88 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तसेच 1 लाख 96 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस लसीवर संशोधन चालू आहे. मात्र, अजूनही प्रभावी लस न आल्यामुळे संसर्गाला आळा बसू शकलेला नाही. ‘वर्ल्डोमीटर’नुसार आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर जगात संक्रमित लोकांची संख्या आता 2 कोटी 83 लाख 63 हजारच्या वर गेली आहे. मात्र, आता बरे झालेल्या लोकांची संख्या 2 कोटी 3 लाख 64 हजारवर गेली आहे. त्याचबरोबर साथीच्या आजारात मृतांचा आकडा 9 लाख 14 हजार 469 पर्यंत पोहोचला आहे.  ही आकडेवारी आहे.

कोरोना विषाणू साथीचा रोग जाहीर झाल्यानंतर सहा महिने झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 11 मार्च रोजी याला साथीचा रोग जाहीर केला. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस गॅब्रिस म्हणाले की, जगातील देशांमध्ये नेतृत्व व एकता नसणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. सर्वच देशांनी एकत्र येऊन सुरुवातीलाच प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाला हरवता आले असते असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘डेक्सामेथासोन’ परिणामकारक

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी गुरूवारी म्हटले की, कोरोना संसर्गाच्या उपचारात डेक्सामेथासोन औषध अत्यंत परिणामकारक ठरत आहे. डेक्सामेथासोन गंभीर आणि क्रिटिकल कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरले आहे. इतर अनेक औषधे सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. जगभरात सुमारे 180 कोरोना लसींवर काम सुरू आहे. यापैकी 35 लसींवर मानवी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले की, ऍस्ट्राजेनेका वॅक्सीनच्या चाचणीमध्ये आजाराचे येणे एक ‘वेक-अप कॉल’प्रमाणे आहे. परंतु यामुळे शास्त्रज्ञांनी निराश होण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या उपचारात चढ-उतारासाठी आपल्याला पूर्णपणे तयार राहिले पाहिजे असे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रेयान म्हणाले.

निधीची जमवाजमव…

विविध देशांमध्ये गरीब लोकांना लस उपलब्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दात्यांकडून मिळालेले दान 700 मिलियन डॉलरची रक्कम अपेक्षेपेक्षा निम्म्याने कमी आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याची लस केवळ श्रीमंत देशांपुरतीच मर्यादित राहू नये, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दोन अरब डॉलर जमवण्याचे लक्ष्य आहे. तर संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी पुढील तीन महिन्यात 35 अरब डॉलर आणखी जमवण्याचे आवाहन केले आहे. ही रक्कम कोरोना नष्ट करण्यासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमासाठी जमवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, आतापर्यंत यासाठी सुमारे तीन अरब डॉलरच्या रक्कमेचे योगदान देण्यात आले आहे.

कोरोनाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱया चर्च प्रमुखांना बाधा...

कोरोना विषाणू महामारी ही ईश्वराची शिक्षा आहे असे सांगणाऱया युपेनमधील चर्चच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. युपेनियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रियाच फिलारेट यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल सकारात्मक आले. शुक्रवारी एका फेसबुक पोस्टद्वाके देण्यात आलेल्या माहितीत त्यांची प्रकृती आता ठिक असल्याचे सांगण्यात आले. चर्च प्रमुखांनी आपले शुभचिंतक आणि समर्थकांना आपल्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 91 वषीय पॅट्रियाच फिलारेट मार्च महिन्यात अचानक चर्चेत आले होते. युपेनियन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

ब्राझील : लसीवर ताण

राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांचे सरकार चीनबद्दल कठोर होते. चीनची एक कंपनी येथे डोरिया या स्थानिक कंपनीबरोबर लस संशोधन करीत आहे. सरकारने मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍Ÿस्ट्रजेनेकाबरोबर काम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच 360 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचा निर्णयही झाला.

फ्रान्समध्ये वेगाने संसर्ग

फ्रान्समध्ये साथीच्या रोगाची दुसरी लाट स्पष्ट दिसत आहे. ऑगस्टच्या प्रारंभापासून संसर्ग वाढला असून गुरुवारी एकूण 8 हजार 577 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. 4 सप्टेंबर रोजी 8 हजार 975 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली. सरकार संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनवरही विचार करत आहे. परंतु लोकांना हे समजताच निषेध सुरू झाला.

नवीन वैद्यकीय संशोधन

हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर म्हटले की, कोविड-19 चे विष्टेद्वारेही प्रसार होऊ शकतो. अभ्यासासाठी चीनच्या गुआंगडोंग प्रांतात 73 रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या वि÷sच्या नमुन्यांचे विश्लेषण केले गेले. विश्लेषण केल्यावर असे आढळले की, विषाणूचे नमुने 40 पेक्षा जास्त रुग्णांच्या विष्टेमध्ये आढळले आहेत. मळमळ, अतिसार किंवा गॅस्ट्रोइन्टोस्टाईनल आजाराशी संबंधित लक्षणे नसलेल्याही सर्व 15 रुग्णांमध्ये सक्रिय आतडय़ांमधील संसर्ग आढळला. विशेष म्हणजे यापैकी 3 रुग्ण कोरोना निगेटिव्ह होते.

ट्रम्प यांनी सत्य लपविले!

डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांना कोरोनाची भीती वाटेल असे भाष्य करणे टाळले. पुस्तकानुसार, त्यांनी साथीच्या आजाराचे परिणाम कमी दाखवण्याचे सत्य देशाला सांगितले नाही. कोरोनाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊन लोकांमध्ये असंतोष पसरला जाईल, हे त्यांना माहीत होते. मात्र, त्यांनी सोयीस्करपणे काही गोष्टींबाबत मौन बाळगले.

आतडय़ांमध्ये इन्फेक्शन…

कोरोना विषाणूचा रूग्णांच्या हृदय आणि फुफ्फुसांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होतो आणि त्याचा प्रभाव बराच काळ राहतो. अलीकडेच कोरोना विषाणूमधून बरे झालेल्या लोकांमध्ये आतडय़ांसंबंधी संसर्ग देखील पाहायला मिळत आहे, ज्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.  नवीन संशोधनानुसार, पॉझिटिव्ह रुग्णांना विषाणू आतडय़ांसंबंधी संसर्ग होऊ शकतो.

Related Stories

कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱया डॉक्टरचा मृत्यू

prashant_c

वृद्धापकाळात ठरली सोशल मीडिया स्टार

Patil_p

ब्राझीलमध्ये 55 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

अफगाणिस्तानात राजधानी, प्रांतामधील शाळा राहणार बंदच

Patil_p

प्रथम कोरोना लस आणण्याचा मान रशियाला

Patil_p

कडाक्याच्या थंडीत चिनी सैन्य गारठले; लडाखमधून 10 हजार सैनिक मागे

datta jadhav
error: Content is protected !!