संगमेश्वर-गोळवलीत टँकर-दुचाकीची धडक
वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या गोळवली येथे टँकर आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान घडला.
अरुण रामा किंजळकर (34, रा. गोळवली किंजळकरवाडी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम. एच. 08 एन. 5481) घेवून तुरळहून गोळवली येथे घरी निघाला होता. याचवेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा नरेंद्र सिंग हा टँकर (क्र. एम. एच. 04 जी. एफ. 5722) घेवून निघाला होता. याचवेळी गोळवली येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होवून दुचाकीचे नुकसान झाले. यात अरुण किंजळकर हा गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. या अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस संताष झापडेकर, मानके, नार्वेकर, मोहिते यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. टँकरचालक नरेंद सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.