Tarun Bharat

महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणारा खड्डा अखेर इन्सुली युवकांनी बुजविला

बांदा/प्रतिनिधी-

मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेवनाका येथे अपघातांना निमंत्रण देणारा भला मोठा खड्डा केतन वेंगुर्लेकर मित्रमंडळाच्या वतीने सिमेंटने बुजविण्यात आला. मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा खड्डा पडला होता. गेले काही दिवस या खड्ड्याच्या अंदाज न येत असल्याने रोज अपघात होत होते. रात्रीच्यावेळी होत असलेले अपघात टाळण्यासाठी इन्सुली येथील युवकांनी पुढाकार घेत हा खड्डा स्वखर्चाने बुजविला. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेवनाका येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्डा पडला त्या ठिकाणी रोज अपघात होत असत तर त्यात रात्रीच्या वेळी खड्डा दिसत नसल्याने अपघात जास्त होत असत. रस्ते विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याने इन्सुली येथील युवकांनी तो खड्डा बुजविण्यास पुढाकार घेत आज दुपारी केतन वेंगुर्लेकर मित्रमंडळाच्या वतीने बुजविण्यात आला.यावेळी केतन वेंगुर्लेकर, फिलिप्स रॉड्रीग्स, योगेश परब, ब्रायटन रॉड्रीग्स, गिरीश झाट्ये, राम कुडव, मिथुन बांदेकर, विलास कुडव, श्याम कुडव, रघुवीर देऊलकर, महादेव सावंत,अण्णा केरकर, अक्षय वेंगुर्लेकर,गुरु पाटील आदीनी श्रमदानातून खड्डा बुजविला.

Related Stories

तामिळनाडूतील विशेष प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील २६ शिक्षकांची टीम रवाना

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : ‘कळंबणी’तील अधिपरिचारिका अन्यत्र वर्गचा आदेश अखेर रद्द

Archana Banage

पोलीस खात्याच्या बदनामीप्रकरणी गुन्हा

NIKHIL_N

नेतर्डेची दिपश्री नाईक जिल्हास्तरावर प्रथम

Anuja Kudatarkar

‘सेव्हन हिल’मध्ये बजावली सलग 45 दिवस रुग्णसेवा

NIKHIL_N

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यावर चाकूहल्ला

Anuja Kudatarkar