Tarun Bharat

महामार्गावर एकाच रात्री तीन घरफोडय़ा

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे मंगळवारी एकाच रात्री 3 घरफोडय़ा करून चोरटय़ांनी येथील पोलिसांची झोप उडवली आहे. यात एक दुचाकीही चोरटय़ांनी पळवल्याचे समजते. घरफोडय़ांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 

यातील एका घरातून चोरटय़ांनी काही ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यातील एकजण बुधवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे घरफोडय़ांबाबाबतच अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. 

यातील एक घरमालक घर बंद करून रत्नागिरी येथे होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरटय़ांनी डल्ला मारत काही ऐवज लंपास केला. घरमालक रत्नागिरी येथून येथे परतल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. एका घरातून चोरटय़ांनी 2700 रुपयांची रोकड लंपास केल्याचे समजते. तर एका घरात चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. एक दुचाकीही चोरटय़ांनी लंपास केली आहे. एकाच रात्री झालेल्या तीन घरफोडय़ांनी भरणे-जाधववाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Related Stories

पाचल येथील एका युवा उद्योजकाची गगनभरारी, नवउद्योजकांसमोर ठेवला आदर्श

Patil_p

वीज कंत्राटी कामगारांचा सातपासून ‘काम बंद’चा इशारा

NIKHIL_N

महाराष्ट्र -गोवा जोडणारा पूल जोडरस्ता खचला

Anuja Kudatarkar

पंडीत नेहरूंबाबत आक्षेपार्ह फेसबूक पोस्टने संताप

Patil_p

कुडाळ भाजप पदाधिकाऱयांनी घेतली नारायण राणेंची भेट

NIKHIL_N

कोकण किनारपट्टीवर वादळाचे सावट

Patil_p