Tarun Bharat

महामार्गावर भीषण अपघातात एकजण ठार, दोघे जखमी

Advertisements

टेम्पो ट्रव्हलर-कारमध्ये धडक

 प्रतिनिधी/ रायगड

रायगड जिह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या तिलोरे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो ट्रव्हलर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, अक्षय घोले (रा. वणौशी, ता. दापोली) हा टेम्पो ट्रव्हलर घेऊन (क्र. एमएच 48 सीबी 3577) मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करीत होता. यावेळी तिलोरे गावच्या हद्दीत आला असता मुंबईकडून येणाऱया वॅगनर कारवरील (क्रमांक एमएच 47 एन 3919) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारचालक सुरेश परब (रा. मालाड, मुंबई) याने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक जखमी झाला असून कारमध्ये मागे बसलेल्या साधना मेस्त्राr यांना लहान-मोठय़ा दुखापती झाल्या तर बाजूला बसलेले शशिकांत पांडुरंग पांचाळ यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

चिपळुणातील नाटय़गृह तत्काळ सुरू करा

Patil_p

अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी डॉ. सारंग कुलकर्णींचा मास्टर प्लान

NIKHIL_N

रत्नागिरी ते गोवा समुद्रात तेल प्रदूषणाचा धोका नाही

Archana Banage

जिह्यात बाधितांच्या संख्येत घट

Patil_p

‘शाळा तिथे मुख्याध्यापकपद’

NIKHIL_N

२४ तासात १०२ नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!