Tarun Bharat

महामार्गावर रखडलेल्या पुलाचे काम नव्याने सुरु

Advertisements

वार्ताहर/ संगमेश्वर

लॉक डाऊनमुळे गेले महिनाभर रखडलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर नजीकच्या शास्त्राrपुलाचे नव्याने उभारणी करण्याचे काम पुन्हा सुरु झाले आहे.

 शास्त्राr पुलाचे काम दिड वर्षात निम्म्यापेक्षा अधिक झाले आणि अचानक शास्त्राr पूलासह अन्य 10 पुलांचे काम संबंधित ठेकेदाराने बंद केले. पूलाचे काम बंद झाल्यावर या पुलाचे डिझाईन चुकल्याचा बातम्या पसरल्या होत्या. प्रसिध्दी माध्यमांनी बंद काम सुरू होण्याबाबत सातत्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र सलग दोन वर्ष बंद स्थितीत असलेले काम नवीन ठेकेदार नेमून सुरु झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले होते मात्र लाक डाऊनमुळे पुन्हा हे काम महिनाभर बंद होते. पंरतु आता ते सुरु झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन शास्त्राr पुलाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. महामार्गावर बांधण्यात आलेला हा पूल अजुनही मजबुत स्थितीत आहे. परंतु अरंद असल्याने दोन्ही बाजुला वाहतूक कोंडीचा समस्या होत्या. आरवली ते बावनदी या अपघातप्रवणक्षेत्रात सर्वात जुना पूल आणि नवीन पुलाचे काम जोरात सुरु करण्यात आले होते. मात्र दीड वर्षापूर्वी हे काम बंद पडले होते. वेगाने सुरु असलेले काम अचानक बंद पडल्याने त्याचे डिझाईन चुकल्याच्या अफवा पसरल्या होत्या. काम बंद होते त्यावेळी या ठिकाणी अपघातही घडले होते. मात्र दीड वर्षांनंतर हे काम पुन्हा सुरु करण्यात आले खरे परंतु लॉक डाऊनमुळे हे काम पुन्हा बंद करावे लागले होते. आता हे काम पुन्हा सुरु झाले आहे. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

कला, वाणिज्य अंतिम परीक्षांचा पुन्हा गोंधळ

Patil_p

दोडामार्गात भाजपचे आंदोलन

NIKHIL_N

रत्नागिरीत यंत्रणा अलर्ट!

Patil_p

कोरोनाने तयार मखरांची आरासच कोसळली

NIKHIL_N

मालवण किनाऱ्यावर लाकडी भुशाद्वारे तेल तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : खेडमध्ये राष्ट्रवादीचा डोक्याला पेंढा बांधत शेतकरी मोर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!