Tarun Bharat

महामोर्चा-सायकल फेरीत मराठी भाषिकांनो ताकद दाखवून द्या

प्रतिनिधी /बेळगाव

येत्या 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारा महामोर्चा तसेच 1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीमध्ये मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी होणार असून, आपली ताकद सरकारला दाखवून देणार आहेत. मोठय़ा संख्येने सीमा बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना सीमाभागातर्फे करण्यात आले आहे.

भाषिक अल्पसंख्याक आयोग, न्यायालय आणि सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करुन त्रिसूत्री भाषांमध्ये परिपत्रके द्यावीत तसेच चौकातील फलक, महानगरपालिकेतील फलक तिन्ही भाषांमध्ये लावावेत त्याचप्रमाणे कागदपत्रेही मराठीमध्ये देण्यात यावीत, अशा मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठी भाषिकांवर कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. त्यामुळे आता भाषिकांना अस्मिता दाखविण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपला भाषिक लढा अधिक बळकट करायचा आहे. त्यामुळे मराठी फलक, मराठी कागदपत्रे मिळावीत या मागणीसह मनपाच्या समोरील अनधिकृत ध्वज हटवावा यासाठी 25 रोजी काढण्यात येणाऱया महामोर्चामध्ये मोठय़ा संख्येने शिवसेनेसह सीमावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख बंडु केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उप शहरप्रमुख राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, वैजनाथ भोगन, निरंजन अष्टेकर, प्रकाश भोसले, यांच्यासह शिवसैनिकांनी आवाहन केले आहे.

Related Stories

सकाळी 10 पासूनच श्री विसर्जनाला सुरुवात करा

Patil_p

चोऱयांच्या सत्राने मारुतीनगरवासीय भयभीत

Amit Kulkarni

ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक

Amit Kulkarni

शंकरगौडा पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

Patil_p

भरत जगताप यांना आचार्य अत्रे पुरस्कार

Amit Kulkarni

बेळगाव-सांबरा रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni