Tarun Bharat

महायुतीत रयत क्रांतीचा बंडाचा झेंडा

प्रतिनिधी / कोल्हापूर

महायुतीतील घटक पक्ष रयत क्रांती संघटनेने पूणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून उमेदवारांच्या नावांची परस्पर घोषणा केली. पदवीधर मतदार संघातून कोल्हापूर जिल्हÎातील प्रा. एन, डी. चौगुले तर शिक्षकमधून प्रा. सुहास पाटील यांना उमेदवारी दिली असून बुधवार 12 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलयाने स्वाभिमानीनंतर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे बंड भाजपला जबर धक्का देणारे ठरु शकतो.

राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पुणे विभागातील शिक्षक, पदवीधर या दोन जागांची निवडणूक होत आहे. पुणे, कोल्हापूर सांगली, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यांचा या मतदार संघात समावेश आहे. पुणे पदवीधर संघावर गेली दोन दशकापासून भाजपचे वर्चस्व आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप, स्वाभिमानी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं अशी महायुती अस्तित्वात आली. 2019 राजू शेट्टी महायुतीतून बाहेर पडले. मात्र त्यांचे सहकारी मंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती शेतकरी संघटना महायुती सोबत राहिली. मात्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीत चुळबुळ सुरु झाली. भाजपने पदवीधरमधून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनीही पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून उमेदवारी जाहीर करुन धक्का दिला.

लोकसभा- विधानसभेला बांधिल होतो

आमची बांधिलकी लोकसभा विधानसभा निवडणुकीपुरती होती. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाबाबत आमचा निर्णय ठरलेला आहे. लोकसभा निवडणुकी रान आम्ही तयार केले. मतदार संघ शिवसेनेला गेला. आमच्या कार्यकर्त्यांन संधी मिळाली पाहिजे. पुणे मतदार संघातील दोन्ही जागा लढवण्यावर ठाम आहोत.
आमदार सदाभाऊ खोत,
संस्थापक रयत क्रांती

Related Stories

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखाची मदत

Archana Banage

मराठा समाजाची पुण्यात गोलमेज परिषद

Archana Banage

कोल्हापूर : चुयेत घोडयाला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल: विरोधी गटाचे नेते खासदार मंडलिक विजयी

Archana Banage

कोल्हापुरात 12 जागा रिपाइं लढवणार : आठवले

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेच्या 641 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा

Archana Banage
error: Content is protected !!