Tarun Bharat

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

               प्रजासत्ताकदिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमान

ऑनलाईन टीम  / नवी दिल्ली : 

कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भईया या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी होणा-या पथसंचलनात हे बालक सहभागी होणार आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी आणि सचिव रबिंद्र पंवार यावेळी उपस्थित होते.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   

गेल्यावर्षी पासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार सुरु केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती  क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या 49 बालकांना यावेळी ‘बाल शक्ती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. अथर्व लोहार  आणि  देवेश भईया या  महाराष्ट्रातील बालकांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त  सर्व बालकांना यावर्षी राजपथावर होणा-या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.

Related Stories

भगवान वामनाचे पहिले पाऊल…

Amit Kulkarni

दरवाज्याच्या आकाराच्या घराची किंमत 1 कोटी

Amit Kulkarni

कोरोनावर केला ‘व्हायग्रा’ ने आघात

Patil_p

योग ही आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया : डॉ. संप्रसाद विनोद

prashant_c

वास्तुशास्त्र आणि खिडकी, दरवाजे

tarunbharat

9 महिलांसोबत एकाचवेळी विवाह

Patil_p