Tarun Bharat

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ऑनलाईन टीम /  मुंबई : 


कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होताना दिसत आहे,  तशा अनेक सरकारी नोकऱ्यांचीही संधी उपलब्ध होत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारच्या आरोग्य विभागात बंपर भरती काढण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांसाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच या संबंधीची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


भरती ड गटातील 3 हजार 466 जागांसाठी होणारविशेष म्हणजे आरोग्य विभागातील ही भरती ड गटातील 3 हजार 466 जागांसाठी असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीतील शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमधून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.


या भरती प्रक्रियेमधून अहमदनगर, धुळे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, परभणी, जालना, सांगली, रत्नागिरी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नंदुरबार, बुलडाणा, नांदेड, बीड, अकोला, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही 22 ऑगस्ट 2021 ही आहे.

Related Stories

काजू कारखानदारांच्या समस्या, अडचणीबाबत समरजित घाटगे यांचे जिल्हा प्रबंधकांना निवेदन

Archana Banage

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ८ ठार

Archana Banage

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज

datta jadhav

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

Archana Banage

थर्टी फर्स्टला पोलिसांच्या कारवाया

Patil_p

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्गासंदर्भात लवकरच निर्णय घेवू : रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांचे खासदार मंडलिक यांना आश्वासन

Archana Banage