Tarun Bharat

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

40 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

भुवनेश्वर : येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो खो स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या मुलांनी व मुलींनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

मुलांच्या गटात महाराष्ट्राने आसामचा 15-10 असा एक डाव राखून 5 गुणांनी पराभव केला. सूरज जोहरे व आदित्य कुदळे यांनी प्रत्येकी 4 गडी बाद करीत दोघांनी प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण
केले.

दुसऱया डावात किरण वसावे व भगतसिंग वसावे यांनी अनुक्रमे 2.00 व 2.10 मिनिटे संरक्षण केले. आसामच्या पप्पू गोगाई याने (1.30 मिनिटे संरक्षण) एकाकी लढत दिली.

मुलींच्या गटातील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने आसामवर 24-9 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राची दिपाली राठोड (2.20मिनिटे संरक्षण व 6 गुण) व कौशल्या पवार (1.20 व 1.40 मिनिटे संरक्षण आणि 5 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात अश्विनी शिंदे (2.00 मिनिटे संरक्षण), सरिता दिव्या व जानव्ही पेठे (प्रत्येकी 2.10 मिनिटे संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली.

अन्य निकाल

मुले

 • मध्य भारत विजयी वि. पंजाब 25-11, 
 • केरळ विजयी वि. झारखंड 18-14,
 • ओरिसा विजयी वि. बिहार 38-4,
 • तामिळनाडू विजयी वि. पाँडिचेरी 11-5,
 • हरियाणा विजयी वि. उत्तराखंड 14-11,
 • आंध्रप्रदेश विजयी  वि. दादर हवेली 16-6,
 • कर्नाटक विजयी वि. मध्य प्रदेश 27-11,
 • दिल्ली विजयी वि. हिमाचल प्रदेश 18-7,
 • पश्चिम बंगाल विजयी वि. त्रिपुरा 23-4.

मुली

 • पंजाब विजयी वि. छत्तीसगड 9-6,
 • पश्चिम बंगाल विजयी वि. मध्य प्रदेश 23-8,
 • मणिपूर विजयी वि. आंध्रप्रदेश 12-9,
 • राजस्थान विजयी वि. पाँडिचेरी 15-5,
 • केरळ विजयी वि. बिहार 16-5,
 • दिल्ली विजयी वि. दादर हवेली 35-0.

Related Stories

बार्बाडोस रॉयल्स प्ले ऑफमध्ये दाखल

Patil_p

रोहितला टी-20 कर्णधार केले नाही तर भारतीय क्रिकेटचे नुकसान

Patil_p

स्ट्रासबर्ग स्पर्धेतून अँड्रेस्क्यूची माघार

Patil_p

पहिली क्रिकेट कसोटी रंगतदार स्थितीत

Patil_p

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांना १९ किलोमीटर धावून वाहिली अनोखी श्रद्धांजली

Archana Banage

भारत दौऱयाकरिता न्यूझीलंड अ संघाची घोषणा

Patil_p