Tarun Bharat

महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाची विजयभरारी

Advertisements

प्रतिनिधी / फलटण :

येथील घडसोली मैदानात उभारण्यात आलेल्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रिडानगरीत आयोजित राष्ट्रीय शालेय खो -खो स्पर्धामध्ये झालेल्या 14 वर्षाखालील मुला- मुलीच्या अंतिम सामन्यावर महाराष्ट्राच्या दोन्ही ( मुले- मुली) संघानी नेत्रदिपक विजयाची मोहर उमटवित विजेतेपद खेचून आणले. महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजयाची बाजी मारल्याने महाराष्ट्र खो खो खेळाडुंवर अक्षरशः प्रेक्षकांमधुन अभिनंदन व शाबासकीचा वर्षाव झाला.

  65 व्या राष्ट्रीय खो -खो स्पर्धा येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रिडानगरीत दि. 2 ते 5 दरम्यान उत्साहात पार पडल्या. देशातील सुमारे 25 राज्यातुन मुला- मुलींचे 60 संघ फलटणमध्ये दाखल झाले होते. यामध्ये 650 खेळाडूंनी फलटणच्या मैदानावर हजेरी लावली होती. शेकडो प्रेक्षकांच्या रोजच्या उपस्थितीत या स्पर्धा संपन्न झाल्या

दि.5 रोजी रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात मुलीच्या संघाने गुजरात संघावर 1 डाव 5 गुणांनी मात करीत दणदणीत विजय मिळविला. मुलांच्या संघात महाराष्ट्र विरध्द तेलंगणा असा सामना झाला. यात महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघावर मात करून 1 डाव 1 गुणाने नेत्रदिपक विजय मिळविला. क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 65 व्या राष्ट्रीय शालेय खो -खो स्पर्धा समारोप झाला.

 याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो -खो असोसिएशन अध्यक्ष संजीवराजे, आ. दिपक चव्हाण, क्रिडा व युवक सेवा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रिडा अधिकारी अनिल सातव, खंडाळा क्रिडा अधिकारी महेश खुटाळे, फलटण पालिका मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तृतीय क्रमांकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यात मुलांच्या दिल्ली संघाने आंध्र प्रदेशवर दोन गुणांनी विजय मिळविला तर मुलींच्या पाश्चिम बंगाल संघाने ओरिसावर दोन गुणांनी विजय मिळविला.

यावेळी मुलांमध्ये उत्कृष्ठ संरक्षक, उत्कृष्ठ आक्रमण, सर्वोत्कृष्ठ खेळाडुंचा बहुमान अनुक्रमे महाराष्ट्राचा रवी वसावे, तेलंगणाचा व्हि. जानकीरमण व महाराष्ट्राचा वैभव मोरे तर मुलींमध्ये गुजरातची हर्षदा मकवाना, महाराष्ट्राच्या भाग्यश्री बडे व अंकिता लोहार यांना देण्यात आला.

Related Stories

“माझी वसुंधरा” अभियानात कराड पालिका राज्यात दुसरी

datta jadhav

सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आमदार शिंदेंचा दे धक्का!

datta jadhav

सातारा : स्वच्छतेसाठी यशस्वी पाठपुरावा

datta jadhav

पोवई नाक्यावरचा रस्ता खचला; बांधकाम विभागाकडून मलमपट्टी सुरु

Archana Banage

सातारा : ट्रक पलटी होऊन एकजण जखमी

Archana Banage

‘अजितदादांनी माझे विचार रुजवण्यासाठी दौरे करावेत’

Archana Banage
error: Content is protected !!