Tarun Bharat

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 26 हजारांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 70 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 25 हजार 988 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 25,988 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 23 हजार 945 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

  • 1,771 पोलिसांवर उपचार सुरू 


सद्यस्थितीत राज्यात 1,771 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 272 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

काहींना टाळता आलं असतं ; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया…

Archana Banage

अजिंक्यतारा वरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करा

Archana Banage

अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावं

datta jadhav

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिली दुधाची बाटली भेट

Archana Banage

क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते

datta jadhav

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

Archana Banage