Tarun Bharat

महाराष्ट्रातील कोविड : गेल्या 24 तासात 21,273 नवे रुग्ण; 34,370 जणांना डिस्चार्ज!

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 21 हजार 273 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 34 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 56 लाख 72 हजार 180 वर पोहचली आहे. 


दरम्यान, कालच्या दिवशी 425 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 92 हजार 225 वर पोहचला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 52 लाख 76 हजार 203 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 93.02 % इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.63 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 01 हजार 041 रुग्ण उपचार घेत आहेत. 


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 40 लाख 86 हजार 110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16.64 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22 लाख 18 हजार 278 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 19 हजार 996 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

  • मुंबई : रुग्ण दुप्पटीचा काळ 351दिवस 


मुंबईत मागील 24 तासात 1,266 नवे रुग्ण आढळून आले. तर 855 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,02,532 वर पोहचली असून त्यातील 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कालच्या दिवशी 36 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 14,778 वर पोहचली आहे. सद्य स्थितीत 28,310 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Related Stories

सोलापूर ग्रामीण भागात मंगळवारी १४८ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

‘या’ बंदरामुळे मालवाहतुकीचा 20 टक्के खर्च कमी होणार

datta jadhav

भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी- इम्रान खान

Archana Banage

हद्दवाढीबाबत घाई करून चालणार नाही !

Archana Banage

कोरोनाच्या 3 लाटेचा मुकाबला करण्यासाठी 5 हजार आरोग्य सहकर्मचारी तयार करणार दिल्ली सरकार

Tousif Mujawar

नवीन प्लॅटफॉर्मचे काम पुढे सरकेना; मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत शंका

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!