Tarun Bharat

महाराष्ट्रातील पहिले ‘प्लाझ्मा थेरपी सेंटर’ रत्नागिरीत

Advertisements

१८ ला होणार उद्घाटन, मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन

प्रतिनिधी / रत्नागिरी

जिल्ह्यातील कोरोनामृत्यू दर कमी करण्यासाठी रविवार १८ रोजी प्लाझ्मा थेरपी सुविधेचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. राज्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील हे पहिले प्लाझ्मा थेरपी सेंटर असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये आहे. तरीही विशेष खबरदारी म्हणून विविध उपाययोजना सुरूच असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. जिल्हा शासकीय विश्रामगृहात आयोजित या पत्रकार परिषदेत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा 28 दिवसानंतर प्लाझ्मा घेता येतो. त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो. गंभीर आजार नसलेले 18 ते 60 वर्षांपर्यंतचे लोक आपला प्लाझ्मा देऊ शकतात. 500 मिली प्लाझ्मा 2 रुग्णांना वापरला जातो. 15 दिवसानंतर पुन्हा तो दान करता येतो. त्यामुळे दात्याला काही त्रास होत नाही, असे सामंत म्हणाले.

जिल्हा रुग्णालयात 18 तारखेला प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू केले जाणार आहे. दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. या सेंटरसाठी लागणाऱया सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. जिह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89 टक्क्यावर गेले आहे. रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयानंतर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातही प्लाझमा सेंटर सुरू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

जनता दरबारात 53 तक्रारी
जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 53 नागरिक उपस्थित होते. यापैकी निम्म्याहून अधिक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या. उर्वरित तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाने करावे, अशा सूचना केल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

Related Stories

आचरा पारवाडी परिसरात बिबट्याची दहशत

NIKHIL_N

शांत सुसंस्कृत शहरातील क्लब, मटका-जुगार बंद करा- संजू परब

Ganeshprasad Gogate

जिह्यात कोरोना मृतांचा आकडा शंभरी पार

Patil_p

उस्मानाबाद : चिखलीतील पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

राजापूरात दोन दिवसांमध्ये सापडले १० कोरोना रूग्ण

Abhijeet Shinde

एसटी कामगार, इंटक पदाधिकारी कामगार सेनेत

NIKHIL_N
error: Content is protected !!