Tarun Bharat

महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होणार ? केंद्रीय मंत्र्यांचा इशारा

Advertisements

मुंबई प्रतिनिधी

राज्यात ओमिक्रोनचे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंदिरं पुन्हा बंदी केली जाण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. तुळजापुरमध्ये कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या पवार यांनी दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय.ओमिक्रोन मुळे रुग्णसंख्या वाढत चालल्यामुळे केंद्रीय आरोग्य मत्रालयाने महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला निर्णयप्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच सूचित केलं आहे. “नियमाचे व केंद्राच्या निर्देशाचे पालन केल्यास अशी वेळ येणार नाही मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात,” असा इशारा भारती पवार यांनी दिला आहे.

Related Stories

शिरोळ उपनगराध्यक्षपदी राजेंद्र माने यांची निवड

Archana Banage

आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

शिवसेनेच्या मंत्र्याकडून छगन भुजबळांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले…

Archana Banage

रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव

datta jadhav

पहिल्या कोरोना बळीमुळे ‘कोल्हापूर’ रेड झोनमध्ये

Archana Banage

सांगलीतील ती बँक महापालिकेकडून सील

Archana Banage
error: Content is protected !!