Tarun Bharat

‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमध्ये काँग्रेस नाहक बदनाम होतय’

सोनिया गांधींनी मागवला अहवाल


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकिय उलथा पालथीमध्ये काँग्रेस विनाकारण बदनाम होत असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात काँग्रेस नाहकरित्या बदनाम होत असल्याची भावना राहूल गांधी यांनी व्यक्त केली.

मुंबईतील सुरु असलेल्या बैठकीअंती सोनिया गांधी याबद्दलचा निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस यंत्रणा ही सक्रीय नाही. या प्रकरणार प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही फारसे बोलताना दिसत नाहीत.

दिल्ली येथे काँग्रेस मध्ये काहीशा हालचाली सुरु झाल्या असुन हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे राजकिय स्थितीचा अहवाल मागितला असल्याचे ही महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री यासंदर्भात स्पष्ट केले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

ग्रामीण रुग्णालयांना एक कोटींची वैद्यकीय उपकरणे-पृथ्वीराज चव्हाण

Patil_p

सततच्या आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

Archana Banage

आरोग्याच्या देखभालीसाठी वन निर्मिती

Patil_p

माझी चौकशी डोमिनिकामध्येच करा!

Patil_p

एकदा निकाल लागू द्या मग सांगतो पुण्यात काय घडलं -अजित पवार

Archana Banage

काँग्रेस नेत्याची बेताल बडबड

Patil_p