Tarun Bharat

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

Advertisements

मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्यातील लॉकडाऊन संदर्भातील राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकी पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील रुग्णसंख्या अजूनही कमी झाली नसल्यामुळे लॉकडाऊन उठवणार की नाही याबाबतची चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नसून त्यामध्ये शिथिलता दिली जाणार आहे.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, एकवीस जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी रेट आहे. त्या अनुषंगाने अशी चर्चा झाली की, ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे आणि रुग्णदरात वाढ जास्त आहे. त्यामुळे बेट्स उपलब्ध हा प्रश्न त्यानिमित्ताने असतोच. लॉकडाऊनच्या बाबत बेड्स उपलब्धता आणि पॉझिटिव्हीटी रेट हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यामुळे एक नक्की आहे की, सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे, तो तसाच राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मग ती शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का? जास्त दुकाने उघडण्याची आहे का? हे सगळे जे बारकावे आहेत. त्याची कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. पण हा कोरोनाचा नवीन प्रकार व्हेरियंट आहे हे निश्चित आहे. त्या दृष्टीकोनातून तो मुद्दा लक्षात घेऊन किंवा सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांचा मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार हा विषय होणार नाही आहे.

जो लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे फक्त त्यांच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. त्या शिथिलतेचे जे बारकावे आहेत, ते बारकावे टाक्स फोर्ससोबत चर्चा करून निश्चित करण्यात येतील. लॉकडाऊनमधील शिथिलता आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केली जाईल,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Related Stories

अडीच कोटींचा निधी बेकायदेशीरपणे वळवला

Patil_p

कोल्हापूर: ZP,पंचायत समिती आरक्षण सोडत सुरू; जाणून घ्या, ओबीसी प्रवर्गासाठी कोणते मतदार संघ आरक्षित आहेत

Abhijeet Khandekar

हातकणंगले येथे जुगार अड्ड्यावर छापा

Archana Banage

चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण

datta jadhav

महाविकास आघाडी अनैसर्गिक होती

Patil_p

जिग्नेश मेवाणींना आसाम पोलिसांनी केली अटक

Archana Banage
error: Content is protected !!