Tarun Bharat

महाराष्ट्रात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात आज (शनिवार) पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 


18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जून पासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. 

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Related Stories

पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी

Abhijeet Shinde

अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

Rohan_P

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने केली ‘ही’ घोषणा

Abhijeet Shinde

शिंगाणापुरात घर जाळण्याचा प्रयत्न, ७ जणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना

Abhijeet Shinde

जिल्हय़ात नवे 25 पॉझिटिव्ह रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!