Tarun Bharat

महाराष्ट्रात आज दिवसभरात 11,111 नवे कोरोना रुग्ण

कोरोनाबळींची संख्या 20 हजारांवर 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 11,111 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 95 हजार 865 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 20 हजार 037 एवढा आहे.

आज दिवसभरात 8837 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 288 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 % आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.36 % आहे. 

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 31 लाख 62 हजार 740 नमुन्यांपैकी 5 लाख 95 हजार 865 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 53 हजार 897 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 203 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्यात अडचण

Patil_p

सांगली : कडेगांव नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर

Abhijeet Khandekar

विजापुरात सहा जण कोरोना बाधित, सीमेवरील जत पूर्वभागात खळबळ

Archana Banage

हुडहुडी! जळगाव, पुण्याचा पारा घसरला

datta jadhav

कोरोनामुळे शेतकऱयांच्या नशिबी ‘भोपळा’

Patil_p

कोल्हापुरात कोरोनाचे 3 बळी, 118 पॉझिटिव्ह

Archana Banage