Tarun Bharat

महाराष्ट्रात इंधन महागच

11 राज्यात अद्याप व्हॅटकपात नाही – 23 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये दरकपातीने दिलासा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकारने ऐन दिवाळीत पेट्रोलमध्ये 5 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलमध्ये 10 रुपयांची कपात झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला. लागोपाठ दुसऱया दिवशी रालोआप्रणित बहुतांश राज्यांनीही व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट झाल्याने सर्वसामान्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. तथापि, महाराष्ट्रासह 11-12 राज्यांनी अद्याप व्हॅटमध्ये कपात न केल्याने नाराजीचा सूर पसरलेला दिसत आहे. दरम्यान, शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रतिलिटर इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रतिलिटर इतकी आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उच्चांक गाठला आहे. दिवाळीपूर्वी सलग सात दिवसांपर्यंत इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. दरम्यान, त्यानंतर केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांनी जनतेला दिलासा देत उत्पादन शुल्क आणि करात कपात केली होती. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत तत्काळ 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त कपात करण्याचा निर्णय घेतला. तथापि, महाराष्ट्र, केरळ, पंजाबसह काँग्रेसप्रणित राज्यांकडून व्हॅटकपातीबाबत चालढकलपणा सुरू आहे. तसेच केरळसारख्या काही राज्यांनी तर व्हॅटकपात करणार नसल्याची घोषणा केल्याने राज्यातील वाहनधारकांना अजूनही महागाईचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्रासह 11 राज्ये आपल्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. या राज्यात अद्याप कर कपात करण्यात आलेली नाही. राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, केरळ, मेघालय, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा  या राज्यांचा अन् अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. सदर राज्यांमध्ये सत्ताधाऱयांविरोधात असंतोष असून काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. पंजाबमध्येही काँग्रेसच्या सरकारविरोधात शिरोमणी अकाली दलाने आंदोलन छेडले असून व्हॅट दरकपातीची मागणी केली आहे.

गेल्या 26 दिवसांपासून 8 ते 9 रुपये दरवाढ

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. ही वाढ गेल्या मंगळवारपर्यंत सुरूच होती. यादरम्यान गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रतिलिटरने महाग झाली. तसेच गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते.  गेल्या 24 सप्टेंबरपासून डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती.  गेल्या 29 दिवसांत ते 9.35 रुपये प्रतिलिटर महागले आहे.

आतापर्यंत 23 राज्यांकडून ‘व्हॅट’कपातीची घोषणा…

केंद्र सरकारने इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर, अनेक राज्य सरकारांनी व्हॅटकराची घट दिली आहे. व्हॅट कमी करण्यात आलेल्या 22 राज्यांची यादी खालीलप्रमाणे ः

1. उत्तर प्रदेश

2. बिहार

3. मध्यप्रदेश

4. गुजरात

5. हरियाणा

6. हिमाचल प्रदेश

7. जम्मू आणि काश्मीर

8. कर्नाटक

9. उत्तराखंड

10. लडाख

11. चंदिगढ

12. गोवा

13. आसाम

14. अरुणाचल प्रदेश

15. सिक्कीम

16. त्रिपुरा

17. मणिपूर

18. नागालँड

19. मिझोराम

20. पुद्दुचेरी

21 ओडिशा

22. दादरा-नगर हवेली

23. दमण आणि दीव

…या बिगर-भाजपशासित राज्यांकडून ‘व्हॅट’कपात नाही!

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या बिगर भाजपशासित राज्यांमध्ये सध्या व्हॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. व्हॅटमध्ये कपात न केल्यामुळे या राज्यांमध्ये आजही पेट्रोल-डिझेल चढय़ा दरांनी विकले जात आहे.

1. दिल्ली

2. पंजाब

3. राजस्थान

4. छत्तीसगड

5. महाराष्ट्र

6. झारखंड

7. तामिळनाडू

8. पश्चिम बंगाल

9. केरळ

10. तेलंगणा

11. आंध्रप्रदेश

Related Stories

श्रूती हासनकडून मतदान केंद्राचा दौरा

Patil_p

थकीत ‘डीए’संबंधी अद्याप निर्णय नाही

Patil_p

केरळच्या पत्रकाराची 28 महिन्यांनी तुरुंगातून सुटका

Amit Kulkarni

प्रमुख विरोधी पक्षांचा आदानी विऱोधात ईडी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

नोटाबंदी विरोधी याचिकांवर आज निर्णय

Patil_p

रामाशिवाय अयोध्या नाहीच!

Patil_p