Tarun Bharat

महाराष्ट्रात उच्चांकी कोरोना रुग्णवाढ

एकूण रुग्णसंख्या 5 लाखांवर 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 12,822 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 03 हजार 084 वर पोहचली आहे. 

शनिवारी दिवसभरात 11 हजार 081 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 47 हजार 048 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 67.26 % आहे. शनिवारी दिवसभरात 275 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 17 हजार 367 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.45 % आहे.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 26 लाख 47 हजार 020 नमुन्यांपैकी 5 लाख 03 हजार 084 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 89 हजार 612 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 625 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आला – चिराग पासवान

Archana Banage

पोलीस हतबल, राज्य सरकारच्या सांगण्यावरून कारवाई : जितेंद्र आव्हाड

Archana Banage

वाझे प्रकरणी संजय निरुपम यांचा शिवसेनेला घरचा आहेर

Archana Banage

ममता बॅनर्जी लढणार पोटनिवडणूक

datta jadhav

शेअर बाजाराची विक्रमी उसळी; सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार

Archana Banage

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या ; भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हे प्रचाऱ्याच्या मैदानात

Archana Banage